आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Railway Minister Piyush Goyal Attacks Lucknow: Security Guard Defends Defamation

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर लखनऊत हल्ला: सुरक्षारक्षकांनी केला बचाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - उत्तर रेल्वे युनियनच्या वार्षिक अधिवेशनात शुक्रवारी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर काही कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांनी हल्ला केला. या लोकांनी कुंड्या आणि दगडफेक केली. यात गाेयल थोडक्यात बचावले. सुरक्षा रक्षकांनी गोयल यांना सुरक्षित बाहेर काढले. रेल्वे कर्मचारी संघटना लोकांची दिशाभूल करत असल्याचे गोयल यांनी भाषणात नमूद केले होते. यामुळेच कर्मचारी चिडल्याचे सांगितले जाते.

 

जुनी पेन्शन योजना, कर्मचारी भरती याबाबत गोयल यांनी आक्रमक उपाय भाषणात सुचवले होते. दरम्यान, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक हा हल्ला केल्याचे सूत्रांनी सांगितले. संघटनेचे नेते शिवगोपाल मिश्र आणि आर. के. पांडेय यांनी मुद्दाम मंत्र्यांसमोर भडक वक्तव्ये केली. त्यामुळे मंत्र्यांनीही यावर भाषणात भाष्य केले आणि वातावरण तापले. जानेवारीत संघटनेची निवडणूक होत असून कर्मचारी संघटनेचे नेते रेल्वेमंत्री आपला अपमान करू शकतात, हे दाखवून देऊ इच्छित होते, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...