आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिलासपूर - विशाखापट्टनम-कोरबा लिंक एक्सप्रेसमध्ये तैनात असलेल्या मुख्य तिकीट निरीक्षक आणि अधिकाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. धावत्या रेल्वेत डेप्युटी चीफ टिकेट इंस्पेक्टर जे किसपोट्टा यांना SA-1 कोचच्या बर्थ क्रमांक 15 वर चामड्याची एक बॅग सापडली होती. त्या बॅगेत तब्बल 15 लाख रुपये रोख होते. तरीही या रेल्वे अधिकाऱ्याने कुठल्याही प्रकारचा विलंब न लावता ती बॅग त्याच्या मालकापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली.
> विशाखापट्टनम ते रायपूरला जाणारे जी.के. राव लिंक एक्सप्रेसमध्ये प्रवास करत होते. परंतु, उतरण्याच्या घाईत ते आपली एक चामडी बॅग परत घेण्यास विसरले. रेल्वे रायपूरवरून निघून 30 मिनिट झाले होते. यानंतर त्यांनी रेल्वे विभागाला यासंदर्भात फोन करून माहिती दिली. बिलासपूरचे चीफ कमर्शियल इंस्पेक्टर ललित यांनी किसपोट्टा यांना त्या बॅगेची माहिती दिली. त्यांनी सांगितलेल्या बर्थवर जाऊन ती बॅग कलेक्ट केली.
> राव यांनी आपल्या बॅगेचा तपशील रेल्वे अधिकाऱ्यांना सांगितला. त्यानुसार, ती बॅग आपलीच असल्याची खात्री पटवून दिली. त्यामध्ये 15 लाख रुपये होते. रेल्वे अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर धावत्या रेल्वेशी संवाद साधण्यात आला. तसेच ट्रेन बिलासपूरला पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी राव यांनी आपल्या एका प्रतिनिधीला पाठवले. बिलासपूर स्टेशनवर आलेल्या राव यांच्या प्रतिनिधीकडे संबंधित अधिकाऱ्यांनी बॅग सुपूर्द केली. या घटनेचे वृत्त संपूर्ण रेल्वे विभाग कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या ग्रुपसह अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये व्हायरल होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.