Home | National | Other State | railway police beat journalist who went there to cover the news

बातमी कव्हर करायला गेलेल्या पत्रकाराला रेल्वे पोलिसांची बेदम मारहाण, मारहाणीचा व्हिडिओ झाला व्हायरल

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 12, 2019, 03:52 PM IST

पत्रकाराने काही दिवसांपूर्वीच रेल्वेतील गैरव्यवहाराचा पर्दाफाश केला होता

  • railway police beat journalist who went there to cover the news

    शामली(उत्तर प्रदेश)- रेल्वे रुळावरून घसरल्याची बातमी कव्हर करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला जीआरपीच्या पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यामुळे घटनेची माहिती मिळाली. सध्या हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

    पोलिसांनी आपला कॅमेरा हिसकावून घेतला आणि नंतर अमानुष मारहाण केल्याची माहितीही या पत्रकाराने दिली आहे. इतके सगळे झाल्यानंतर आपल्याला कैद करून ठेवण्यात आल्याचेही त्या पत्रकाराने सांगितले. दरम्यान, पत्रकाराला अमानुष मारहाण करत गैरवर्तन करणाऱ्या जीआरपीच्या 4 पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबित करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये स्टेशन हाऊस अधिकारी राकेश कुमार आणि हवालदार सुनील कुमार यांचा समावेश आहे.

    पत्रकाराने काही दिवसांपूर्वीच रेल्वेतील गैरव्यवहाराचा पर्दाफाश केला होता, याचा राग मनात धरून पत्रकाराला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Trending