आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Railway, Road Transport Were Blocked In Tripura Against The Citizenship Amendment Bill

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात त्रिपुरात रेल्वे, रस्ते वाहतूक रोखली

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

आगरतळा - केंद्र सरकारच्या प्रस्तावित नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात इंडिजिनस नॅशनलिस्ट पार्टी ऑफ त्रिपुरा (आयएनपीटी)ने गुरुवारी आगरतळा आणि धर्मानगर दरम्यान रास्ता रोकाे आणि रेल रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.पूर्वोत्तर सीमांत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनामुळे संध्याकाळपर्यंत रेल्वे सेवा बंद ठेवली होती, तर सियालदे जाणारी कंचनजंगा एक्स्प्रेसला सकाळी ५.५५ वाजता तिच्या निर्धारित वेळेऐवजी १.३० वाजता रवाना करण्यात आले. नवी दिल्लीला जाणारी त्रिपुरा सुंदरी एक्स्प्रेसला दुपारी २ वाजेऐवजी संध्याकाळी ६.३० वाजता रवाना करण्यात आले. त्रिपुरातील दक्षिण भागात वाहतूक सेवेवर कोणताही परिणाम झाला नाही. राष्ट्रीय महामार्गावरुन आगरतळाहून उत्तरेकडील शहरात जाणाऱ्या वाहनांचे मार्ग बदलण्यात आले होते. आंदोलनामुळे सकाळपासूनच पश्चिम त्रिपुरात बारामुला हिल रेंजमध्ये दोन्हीकडे सामान भरलेले ट्रक उभे होते. सरकारने रस्त्यावरील सुरक्षा वाढवली होती. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे निर्देश देण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...