Home | Maharashtra | Vidarva | Akola | railway wagon repairing project

रेल्वे वॅगन दुरुस्ती प्रकल्प; रस्त्याचा अडसर झाला दूर

प्रतिनिधी | Update - Dec 09, 2018, 09:37 AM IST

बडनेरा-काटआमला रस्त्याला पर्यायी रस्ता मंजूर

  • railway wagon repairing project

    अमरावती- रेल्वे वॅगन दुरुस्ती प्रकल्पातील महत्त्वाचा अडसर ठरलेला बडनेरा-काटआमला रस्त्याला पर्यायी रस्ता मंजूर झाल्याने प्रकल्पातील महत्त्वाचा अडसर दूर झाल्याची माहिती एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातूरकर यांनी पत्रकाद्वारे दिली.
    बडनेरा येथे बडनेरा काटआमला रस्त्यावर रेल्वे वॅगन दुरुस्ती प्रकल्पाचे काम सुरू आहे. सदर प्रकल्प व रेल्वे लाईन यांच्यामध्ये बडनेरा-काटआमला रस्ता येतो. या रस्त्याला पर्यायी मार्ग दिल्या शिवाय प्रकल्प सुरू होणे अशक्य होते. त्यामुळे पर्यायी रस्त्याच्या मंजुरीसाठी असोशिएशनच्या वतीने प्रयत्न करण्यात येत होते.


    दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली असल्याची माहिती पातूरकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. सदर प्रकल्पाचे काम गुजरातच्या कंपन्यांकडे देण्यात आले आहे. परंतु प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी बडनेरा-काटआमला रस्ता अडसर ठरला होता. जोपर्यंत हा मार्ग बंद केला जात नाही व मुंबई रेल्वे लाइनवरुन प्रकल्पासाठी रेल्वे लाईन टाकली जात नाही तोपर्यंत हा प्रकल्प सुरू होणे अशक्य होते. सदर पर्यायी मार्गासाठी रेल्वेचे अधिकारीही प्रयत्नशील होते. सदर कामाला गती येऊन प्रकल्प त्वरित पुर्ण व्हावा यासाठी पातूरकर, पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार डॉ. सुनील देशमुख, जिल्हाधिकारी अभिजित बांगर प्रयत्नशील होते. जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत रस्त्यांबाबत निर्णय घेण्याचे ठरवण्यात आले.
    दरम्यान, ३ डिसेंबर रोजी बडनेरा-काटआमला रस्त्यासाठी पर्यायी मार्ग मंजूर करण्यात आला असून कार्यारंभ आदेश देण्यात आल्याची माहिती किरण पातूरकर यांनी दिली.

Trending