आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वेने १० वर्षांत भंगारातून कमावले ३५ हजार काेटी रु.; डबे, वाघिण्या व रूळ विक्री करून कमाई

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय रेल्वेने गेल्या दहा वर्षांमध्ये भंगार विक्री करून ३५,०७३ काेटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. रेल्वेने जुने डबे, वाघिण्या व रेल्वे रूळ विकून ही कमाई  केली आहे. रेल्वेने महिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे की पूर्वाेत्तरमधल्या तीन राज्यांच्या वार्षिक अर्थसंकल्पापेक्षा ही रक्कम जास्त आहे. २०१८-१९ साठी सिक्कीमसाठी वार्षिक बजेट जवळपास ७,००० काेटी रुपये आहे. मिझाेरामचे बजेट ९,००० काेटी रुपये व मणिपूरचे १३,००० काेटी रुपये आहे. मध्य प्रदेशातल्या माळवा- निमाड भागातील सामाजिक कार्यकर्ते जिनेंद्र सुराणा यांना आरटीआयद्वारे ही माहिती दिली आहे. १० वर्षांत २०११-१२ मध्ये सर्वात जास्त ४,४०९ काेटींी भंगाराची विक्री झाली. २०१६-१७मध्ये भंगार विकून २,७१८ काेटी रु.मिळाल्याचे रेल्वे बाेर्डने म्हटले आहे.

भंगाराच्या कामाईत रेल्वे रुळांचा सर्वात जास्त वाटा
रेल्वे बाेर्डनुसार भंगार विक्रीमध्ये सगळ्यात जास्त वाटा रेल्वे रुळांचा आहे. वर्ष २००९-१० ते २०१३-१४ दरम्यान रेल्वे रूळ विकून रेल्वेला ६,८८५ काेटी व वर्ष २०१५-१६ ते २०१८-१९ दरम्यान ५,०५३ काेटी रुपये मिळाले. गेल्या वर्षात रेल्वे रुळांची विक्री करून एकूण ११,९३८ काेटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. सुराणा म्हणाले, गेल्या पाच वर्षांत रुळांमध्ये खूप कमी बदल झाला असे वाटते.

बातम्या आणखी आहेत...