आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून तीन वर्षांत वसूल केला १ हजार ३७७ कोटींचा दंड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रेल्वेने गेल्या तीन वर्षांत तिकीट न काढता फुकटात प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून १ हजार ३७७ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. तीन वर्षांत या रकमेत ३१ टक्के वाढ झाली आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत (आरटीआय) दाखल अर्जातून ही माहिती समोर आली आहे.

मध्य प्रदेशमधील एका कार्यकर्त्याने आरटीआयअंतर्गत हा अर्ज दाखल केला होता. या अर्जातून समोर आलेल्या माहितीनुसार, २०१६ ते २०१९ या तीन वर्षांत भारतीय रेल्वेने तिकीट न काढणाऱ्या प्रवाशांकडून १ हजार ३७७ कोटी रुपये वसूल केले आहेत. २०१८ मध्ये रेल्वेशी संबंधित संसदीय समितीने रेल्वेचा २०१६-१७ च्या आर्थिक अहवालाची तपासणी केली होती. तिकीट न काढणाऱ्या प्रवाशांमुळे विभागाला मोठे आर्थिक नुकसान होत असून समितीने त्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंडळाने विभागीय मंडळांना तिकीट न काढणाऱ्या प्रवाशांकडून दंड वसूल करण्याची कडक मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, फुकट्या प्रवाशांकडून २०१६-१७ मध्ये ४०५.३० कोटी रुपये, २०१७-१८ मध्ये ४४१.६२ कोटी रुपये आणि २०१८-१९ मध्ये ५३०.०६ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला.