आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Railway's Structure Of 114 Years Old Will Change, Now There Will Be 5 Members In Board Instead Of 8 : Railway Minister

रेल्वेची 114 वर्षांपूर्वीची रचना बदलणार, बोर्डात असतील आता 8 ऐवजी 5 सदस्य रेल्वेतील विभागीय गटबाजी आता संपेल : रेल्वेमंत्री

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : केंद्र सरकारने रेल्वेची ११४ वर्षांपूर्वीची रचना बदलण्यास मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. यानुसार, ग्रुप-एच्या आठ सेवांचे विलीनीकरण करून भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा सुरू होईल. अभियांत्रिकी, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल्स, लेखा, स्टोअर, कार्मिक, वाहतूक, सिग्नल आणि टेलिकॉम या सेवा एकत्र केल्या जातील. मंगळवारपासूनच हा निर्णय लागू झाला आहे.

रेल्वे बोर्डाच्या सदस्यांची संख्या ८ वरून ५ करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले, रेल्वे बोर्डाची सर्वप्रथम १९०५ मध्ये स्थापना झाली होती. हा विभाग ११४ गटांत विभागलेला होता. आठही सेवांचे अधिकारी आपापल्या विभागांचाच विचार करत होते. आता ही गटबाजी बंद होईल. निर्णय लवकर होतील.

रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांची भूमिका आता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासारखी असेल. बोर्डात रेल्वेची आधारभूत रचना, ऑपरेशन्स, बिझनेस डेव्हलपमंेट, रोलिंग स्टॉक आणि आर्थिक विषयाशी संबंधित अशा महत्त्वाच्या विभागांचे सदस्य असतील. नव्या बोर्डात तीन सदस्यांची पदे रद्द करण्यात आली आहेत. यात आता काही स्वतंत्र सदस्य असतील. यात दीर्घकाळ अनुभव असलेल्यांचा समावेश असेल.

  • रेल्वे बोर्डाची सर्व पदे आता सर्व प्रकारच्या सेवांशी संबंधित अधिकाऱ्यांसाठी खुली होणार.
  • पात्रता व क्षमतेच्या आधारावर या पदांवर होणार सदस्यांची नियुक्ती.
  • मनुष्यबळ व्यवस्थापनात अध्यक्ष महासंचालकासोबत काम करेल.

आता भारतीय रेल्वे आरोग्य सेवा

भारतीय रेल्वे चिकित्सा सेवा आता भारतीय रेल्वे आरोग्य सेवा म्हणून ओळखली जाईल. दरम्यान, २०२१ मध्ये होत असलेल्या भरती परीक्षेत आयआरएमएस केडरमध्ये अधिकाऱ्यांची भरती होईल.

सचिव पातळीवरील १० पदे बोर्डात असतील

बोर्डात सचिव पातळीवरील १० पदे असतील. तर, महाव्यवस्थापक पातळीवरील २७ पदांचे ग्रेड वाढवून वरिष्ठ ग्रेड दिले जातील. सर्व झोनल तसेच उत्पादन संस्थांचे महाव्यवस्थापक आता केंद्रीय सचिवाच्या समकक्ष असतील. केवळ पात्रता आणि क्षमतेच्या आधारेच सक्षम लोकांच्या नियुक्त्या होतील.
 

बातम्या आणखी आहेत...