आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक दिवसानंतर रेल्वे संपूर्ण देशभरातील प्रवाशांना देणार आहे 'ही' मोठी सुविधा, मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येककाला मिळू शकतो याचा लाभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - रेल्वेच्या तिकिटासाठी लांब रांगेत उभे राहणे ही बाब आता भूतकाळात जमा होणार आहे. कारण आता आपण फक्त मोबाईल अॅपद्वारे रेल्वेचे जनरल तिकिट बुक करू शकणार आहात. नोव्हेंबरपासून या सुविधेला सुरूवात होणार आहे. त्यानंतर  तुम्ही रेल्वेच्या यूटीएस मोबाईल अॅपद्वारे रेल्वेचे जनरल तिकीट बुक करू शकताल.

 

> ही योजना सर्वप्रथम मुंबईत चार वर्षांपूर्वी सुरू झाली. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात लोक प्रवास करतात. त्यानंतर दिल्ली आणि चेन्नईमध्ये या सेवेची सुरुवात करण्यात आली. 1 नोव्हेंबरपासून देशातील सर्व रेल्वे प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. 

मागील चार वर्षांत 45 दशलक्ष युझर या अॅपला जोडले गेले आहेत. रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने पत्रकारांना सांगितले की, याद्वारे दररोज सरासरी 87 हजार तिकीट बुक केले जातात. या अॅपमधून एकाचवेळी फक्त चार तिकीटे बुक करू शकतात. रजिस्टर्ड युझर फक्त रेल्वे तिकिटच नाही तर प्लॅटफॉर्मचे तिकीट आणि मासिक पास देखील याद्वारे खरेदी करू शकतात. या अॅपद्वारे बुक केलेल्या तिकिटामुळे रेल्वेला दररोज 45 लाख रुपये उत्पन्न मिळकत होत आहे.

 

अॅप कसे डाउनलोड करावे ?
> अँड्रॉइड, आयओएस आणि विंडोज या तिन्ही फोनवर यूटीएस मोबाइल अॅप काम करते. अॅप डाउनलोड केल्यानंतर, आपल्याला त्यावर युझर आयडी आणि पासवर्ड सेट करावा लागेल. आपण तिकीट बुक करतांना आपल्या स्टेशनपासून सुमारे 25 ते 30 मीटर अंतरावर असणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...