आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rain : Bollywood Celebrity Are In Troubled Due To The Rain, Rakul Prit Singh Stuck At The Airport

Rain : पावसामुळे परेशान झाले बॉलिवूड सेलेब्रिटी, एअरपोर्टवर अडकली रकुल प्रीत, अमिताभ यांच्या घराबाहेर भरले तुडुंब पाणी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : मुंबई सध्या पूर्णपणे पाण्याने भरली आहे. बीएमसी कमिश्नरनुसार, मायानगरीमध्ये केवळ 2 दिवसांमध्ये 10 वर्षांचा रेकॉर्ड तुटला आहे आणि आता 540 मिलीमीटर पाऊस झाला आहे. एवढ्या पावसानंतर रेल्वे ट्रक्सपासून एअरपोर्टमध्ये पाणी भरले आहे आणि अनेक फ्लाइट्स रद्द झाल्या आहेत. अशात परिस्थितीत सेलेब्रिटीच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. अनेक स्टार्सने याबद्दल चिंता व्यक्ती केली आहे. काही प्रशासनावर आपला राग काढत आहेत तर काही स्वतः या पुराची शिकार झाले आहेत.  

 

ट्विटरवर सोनमने विचारली एअरपोर्टची परिस्थिती... 
सोनम कपूरने ट्वीट करून फ्लाइटबद्दल विचारले असता रकुल प्रीतने तिला फ्लाइट कॅन्सल झाल्या असल्याची माहिती दिली आहे. 

 

सोनमने ट्वीट करून विचारले, 'कुणी मला सांगू शकते का की, एअरपोर्ट सुरु आहे कि नाही.'

 

सोनमच्या या ट्वीटवर 'दे दे प्यार दे' मधील अभिनेत्री रकुल प्रीतने उत्तर दिले, 'काल रात्रीपासून कोणत्याच फ्लाइटने मुंबई एअरपोर्टहून उड्डाण केले नाही. मी स्वतः येथे अडकलेली आहे.'

 

बिग-बींच्या बंगल्याबाहेर भरले पाणीच पाणी... 
याव्यतिरिक्त अमिताभ बच्चन यांचा बांगला जलसाच्या बाहेर खूप पाणी भरले आहे. परिस्थिती अशी आहे की, रस्त्यावर भरलेले पाणी आता बंगल्यामध्ये शिरत आहे. पाण्यामुळे घराच्या आत जाणेही कठीण झाले आहे. बिग-बीच्या घराबाहेर अशाप्रकारे पाणी भरले जाणे काही नवी गोष्ट नाही. प्रत्येकवर्षी त्यांच्या घराबाहेर असेच पाणी भरते. सध्या त्यांच्या घराबाहेर पाणी हटवण्याची कवायत सुरु आहे.  

 

या भागात अमिताभ यांच्यासह आणखी अनेक स्टार्सचीदेखील घरे आहेत आणि तेही सध्या पावसाने हैराण आहेत. अक्षय कुमार, ऋतिक रोशन, शशी कपूर यांचेही घर याच भागात आहे. प्रसिद्ध पृथ्वी थिएटरदेखील याच रोडच्या जवळ आहे.  

 

क्रिस्टलने घेतला करणच्या घराचा आधार... 
पाण्यामुळे अभिनेत्री क्रिस्टल डिसूजाला 'ये मोहब्बते' फेम अभिनेता करण पटेलच्या घराचा आधार घ्यावा लागला. अभिनेत्रीने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये तिने सांगितले की, कशाप्रकारे मुंबईच्या पावसामध्ये करणने तिला वाचवले. क्रिस्टलने सांगितले की, ती पावसामध्ये फसली होती. तिने करणला फोन करून मदत मागितली. करणदेखील चांगल्या मित्राचे कर्तव्य समजून तिला घ्याल पोहोचला. मात्र स्वतः करणचीही कारपावसाच्या पाण्यामध्ये फसली होती पण ते लवकरच तिथून बाहेर पडले आणि घरी आले. 

 

क्रिस्टलची इंस्टा पोस्ट... 

 

 

अशोक पंडितने काढला बीएमसीवर राग ... 
तसेच प्रोड्यूसर अशोक पंडितदेखील पावसामुळे परेशान आहे, त्याने त्यामुळे प्रशासनावर राग काढला आहे. आपल्या ट्विटर हैंडलवर दोन फोटो शेअर करून बीएमसीच्या अयशस्वी कामाकडे बोट दाखवले आहे. दोन फोटोपैकी एक 2005 चा आहे जॅमध्ये मुंबई पाण्याने भरलेली दिसते आहे. तर दुसरा फोटो 2019 चा आहे ज्यामधेदेजखील रस्ते पाण्याने तुडुंब भरले आहेत. प्रोड्यूसरने ट्वीटमध्ये लिहिले, '26 जुलै 2005 पासून आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च झाले पण फायदा काहीच झाला नाही. सामान्य माणूस आजही परेशान आहे. ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे.'

बातम्या आणखी आहेत...