आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरुण राजाची कृपा: राज्यात पाऊसधारा; मध्य, उत्तर महाराष्ट्र चिंब, बळीराजा सुखावला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या काही दिवसांपासून नाशिक परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. नाशिकपासून आठ किमीवर असलेला  साेमेश्वर धबधबा ओसंडून वाहत असून पर्यटकांची येथे मोठी गर्दी होत आहे. - Divya Marathi
गेल्या काही दिवसांपासून नाशिक परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. नाशिकपासून आठ किमीवर असलेला साेमेश्वर धबधबा ओसंडून वाहत असून पर्यटकांची येथे मोठी गर्दी होत आहे.

पुणे, रत्नागिरी  - गेल्या २४ तासांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. या दोन्ही जिल्ह्यांतील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे काही शहरांत पाणी शिरले आहे. मुंबई- गोवा महामार्ग गेले २ दिवस वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद आहे. माथेरान या  पर्यटनस्थळावर पर्यटक अडकून पडले आहेत, तर वीकेंडला येणाऱ्या पर्यटकांनी आपले बुकिंग रद्द केल्याने सुमारे ५० लाखांचे नुकसान झाल्याचे येथील पर्यटन व्यावसायिकांनी सांगितले.  


चिपळूण बाजारपेठेत पाणी घुसले असल्याने चिंचनाका परिसरात जवळपास एक फूट पाणी असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट होता. वाशिष्ठी पूल बंद करण्यात आल्याने लोटे औद्योगिक वसाहतीकडे जाणारी वाहतूक गुहागर बायपासमार्गे फरशी तिठा अशी वळवण्यात आली होती. आजच्या संततधार पावसामुळे खेड, दापोलीबरोबरच संगमेश्वर, राजापूर येथील सखल भागात पाणी घुसले. राजापूर जवाहर चौक येथे पाणी आल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात शुक्रवारी रात्रीदेखील पावसाची संततधार राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे राज्यतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा राज्याच्या हवामान खात्याने दिला आहे.


पुण्यात संततधार
पुण्यात गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस शनिवारी सायंकाळपर्यंत सुरू होता. संततधार पावसामुळे पुण्याच्या धरणसाखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणात तसेच पिंपरी-चिंचवड परिसरातील पवना धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे.

 

घाटात दरड कोसळ रेल्वे रद्द
अतिपावसामुळे खंडाळा घाटात मंकीहिल परिसरात रेल्वेट्रॅकवरच दरड कोसळल्याने  डेक्कन क्वीन, इंद्रायणी या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ट्रॅकवरच दगड,मातीचा ढिगारा साचल्याने रेल्वे वाहतूक पूर्ण विस्कळित झाली आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...