आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भात झाली अतिवृष्टी, मराठवाड्यात हलका, उत्तर महाराष्ट्रात बुधवारपर्यंत मुसळधारची शक्यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील शनिवारी झालेल्या पावसानंतरची स्थिती. - Divya Marathi
मुंबईतील शनिवारी झालेल्या पावसानंतरची स्थिती.

औरंगाबाद - छत्तीसगड आणि नजीकच्या भागातील कमी दाबाचा पट्टा शनिवारी पुढे सरकला असून तो आता नैऋत्य मध्य प्रदेश व नजीकच्या भागात आला आहे. परिणामी २३ आणि २४ सप्टेंबर या काळात उत्तर मध्य महाराष्ट्र व उत्तर कोकणात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात काही जागी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. शनिवारी विदर्भात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. 


आयएमडीनुसार, शुक्रवारी छत्तीसगड व परिसरातील कमी दाबाचे क्षेत्र नैऋत्य मध्य प्रदेश व परिसरात सरकल्याने मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मिरात २३ व २४ सप्टेंबर रोजी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. या काळात उत्तर-मध्य महाराष्ट्र व उत्तर कोकणात मुसळधारची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. शनिवारी विदर्भात हिंगणघाट, वरोरा, वर्धा, चांदूरबाजारात अतिवृष्टी झाली, तर मराठवाड्यात वसमत, उत्तर महाराष्ट्रात रावेर येथे अतिवृष्टीची नोंद झाली आहे. 

 

पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार 
२३ सप्टेंबर : गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता. 
२४ सप्टेंबर : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली. 
२५ व २६ सप्टेंबर : संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता. 

बातम्या आणखी आहेत...