आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावमध्ये संततधार; पुलावर पाणी असताना अनेकांना मदत हात देणारा युवक नाल्यात वाहिला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गेल्या १९ दिवसांपासून दडी मारून असलेला पाऊस गुरुवारच्या पहाटेपासूनच शहरात दमदार बरसला. संततधार पावसामुळे शहरातील सर्वच नाल्यांना पूर अाला. अयाेध्यानगर व लक्ष्मीनगरला जाेडणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेकांना पूल अाेलांडण्यासाठी मदत करणारा ३५ वर्षीय तरुण नाल्याला अालेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेला. या तरुणाचा शाेध महामार्गापर्यंत घेण्यात अाला. मात्र, ताे सापडला नाही.

 

कुटुंबीयांना अामदार सुरेश भाेळेंनी दिला धीर
घटनेनतंर अामदार सुरेश भाेळे यांनी तत्काळ घटनास्थळाला भेट दिली. या वेळी त्यांनी घटनेच्या वेळी उपस्थित नागरिकांशी चर्चा करून शाेध घेण्याबाबत तहसीलदार अमाेल निकम यांना सूचना दिल्या. तहसीलदार निकम यांनीही कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. अामदार भाेळे व तहसीलदार निकम यांनी हेमंत वाणी यांच्या घरी जाऊन कुटुंबायांना धीर दिला.

बातम्या आणखी आहेत...