आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rain In Madhya Pradesh, Jharkhand, Delhi, Punjab, Haryana, However, Temperature Rise

मध्य प्रदेश, झारखंड, दिल्लीत पाऊस, पंजाब-हरियाणात पाऊस, मात्र तापमानात वाढ; थंडीपासून दिलासा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : देशातील काही भागांत वेगवेगळ्या वातावरणाचा अनुभव आला. दिल्लीत पावसाने हजेरी लावली, तर हिमाचलमध्ये हिमवृष्टी झाली. दिल्ली व हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरसह काही ठिकाणी थंडीचा कडाका वाढला. दिल्लीत झालेल्या पावसामुळे धुक्याचे प्रमाण वाढले होते. मात्र, पंजाब आणि हरियाणात तापमानात वाढ झाल्याचे दिसून आले.

दिल्लीत बुधवारी सकाळी आठच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. दिल्लीत दोन-तीन दिवसांपासून पाऊस होत असल्याने हवेची गुणवत्ता सुधारली आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार पुढील २४ तासांत पाऊस बंद झाल्यानंतर हवेची गुणवत्ता आणखी खराब होईल. स्कायमेट वेदरच्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासांत सफदरजंग भागात सहा मिलिमीटर, पालममध्ये पाच मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.

मध्य प्रदेशातही काही भागात पावसाने हजेरी लावली. हवामानात बदल झाल्याने राज्यात थंडी कमी झाल्याचे हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले. मात्र, दोन-तीन दिवसांनी थंडीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. बुधवारी राज्यातील ईशान्य भागात काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. राज्यात अनेक ठिकाणी रात्रीच्या तापमानात काहीशी वाढ झाली आहे. येत्या चोवीस तासांत राज्यातील रिवा, शहडोल आणि जबलपूर भागात, तसेेच सागर, दमोह, होशंगाबाद आणि गुना जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पंजाब, हरियाणातील तापमान वाढले

गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीला तोंड देणाऱ्या पंजाब आणि हरियाणाला काही दिलासा मिळाला आहे. पाऊस झाल्यानंतरही या दोन्ही राज्यातील तापमानात वाढ दिसून आली आहे. पंजाबमधील पठाणकोटमध्ये किमान तापमान ९.४ अंश नोंदवण्यात आले. येथे सर्वाधिक ६५ मिलिमीटर पाऊस झाला. चंदिगडमध्ये किमान तापमान १०.७ अंश होते. येथे २२.९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. पंजाबमधील अमृतसर, लुधियाना, पतियाळामध्ये अनुक्रमे ७.६ अंश, १०.१ आणि ११.५ अंश तापमान नोंदवण्यात आले.
 

बातम्या आणखी आहेत...