Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | rain-in-sangmeshwar

संगमेश्वरला पावसाच्या सरी

दिव्य मराठी टीम | Update - May 24, 2011, 06:41 PM IST

संगमेश्वरमध्ये सोमवारी सकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या.

  • rain-in-sangmeshwar

    संगमेश्वर - संगमेश्वरमध्ये आज सकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. त्यामुळे सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला.    गेले काही दिवस संगमेश्वरमध्ये उकाड्याने कहर केलाय. त्यातच आठ-दहा दिवसांपूर्वी देवरूख आणि परिसरात मुसळधार पाऊस झाला होता. पण संगमेश्वर परिसरात मात्र पावसाने पाठच फिरवली होती. सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर, माभळे, कोंड असुर्डे आदी गावांमध्ये सुमारे पंधरा मिनिटे पावसाने हजेरी लावली. सकाळच्या वेळी झालेल्या या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला होता.Trending