Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | rain in sindhudurg

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी

divya marathi team | Update - May 30, 2011, 05:14 AM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात ठिकठिकाणी रविवारी सकाळी मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसाचा जोर सह्याद्रीच्या रांगांमध्ये जास्त होता.

  • rain in sindhudurg

    सिंधुदुर्ग - जिल्ह्यात ठिकठिकाणी रविवारी सकाळी मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसाचा जोर सह्याद्रीच्या रांगांमध्ये जास्त होता. दरम्यान, उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. गेल्या तीन- चार दिवसांपासून कमालीचा उकाडा वाढला होता. काल रात्री उशिरापर्यंत गडगडाटासह विजा चमकत होत्या. आज पहाटे चारच्या सुमारास जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस झाला. सह्यादीच्या रांगांमध्ये पावसाचा जोर जास्त होता. किनारपट्टीकडे मात्र पाऊस झाला नाही. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. जिल्ह्यात मान्सून यंदा लवकर येईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.

Trending