Rainfall / औरंगाबादेत पाऊस आबाद, दमदार बरसला; ३ तासांत 33 मिमी पाऊस

मराठवाड्यात पावसाची तूट ३३ टक्के 

प्रतिनिधी

Jul 11,2019 08:43:45 AM IST

औरंगाबाद - औरंगाबादेत बुधवारी यंदाच्या जुलैमधील पहिला मोठा पाऊस झाला. सायंकाळी पाच वाजता जोरदार पुनरागमन करणाऱ्या पावसाचा जोर नंतर काहीसा कमी झाला. रात्री आठ वाजेपर्यंत ३३.१ मिमी पावसाची नोंद चिकलठाणा वेधशाळेत झाली.

> औरंगाबादेत 153.2 मिमी पाऊस आतापर्यंत झाला. १६७ मिमी पाऊस होणे अपेक्षित होते.
> औरंगाबादेत नऊ जुलैअखेर 08 टक्के पावसाची तूट. गतवर्षी याच काळात १५०.२ मिमी पाऊस झाला होता.

मराठवाड्यात पावसाची तूट ३३ टक्के

औरंगाबादेत बुधवारी दमदार पाऊस झाला असला तरी मराठवाडा अद्याप तहानलेलाच आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या ताज्या अहवालानुसार मराठवाड्यात ९ जुलैअखेर पावसाची ३३ टक्के तूट पडली आहे. सर्वाधिक ५० टक्के तूट नांदेड व हिंगोली जिल्ह्यात असून बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, जालना या जिल्ह्यांत सरासरीच्या तुलनेत २० ते ३९ टक्के पाऊस कमी झाला आहे.

X
COMMENT