आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोर "धार’ : नाशिक जिल्ह्यात पाऊस; गंगापूर ३५ तर दारणा धरण भरले ४१.४५ टक्के

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शनिवार - रविवारी जाेराने बरसलेला पाऊस सोमवारी काहीसा संथ झाला. धरणांच्या पाणलोटमध्येही कमीच बरसल्याने धरणांत आवकही घटली. त्यामुळे गंगापूर धरणातही सोमवारी सायंकाळी ६ वाजता ३५ टक्के तर दारणात ४१.४५ टक्के पाणी उपलब्ध झाले. गत १८ तासात गंगापूरमध्ये ४ टक्के तर दारणात सुमारे ६ टक्के पाण्याची वाढ झाली. 

 

त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यांवर तीन दिवसांपासून वरुणराजा मेहरबान झाला आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. शनिवार-रविवारच्या तुलनेत सोमवारी पावसाचे प्रमाण कमी झाले तरीही दिवसभरात त्र्यंबकेश्वर ५५ मिमी, आंबोली ६९ मिमी , गंगापूर परिसरात ३० मिमी तर इगतपुरी ५८, दारणा धरणाच्या परिसर २६ आणि भावलीच्या परिसरात ८५ मिमी पाऊस पडला. त्यामुळे गंगापूर धरणात ६२ दलघफूने पाण्याची आवक सुरू होती. तर दारणात २१७ दलघफू आणि भावलीत ३८ दलघफूने पाणी प्रवाह येत असल्याने गंगापूर आणि दारणा धरणांच्या साठ्यात १८ तासात अनुक्रमे ४ व ६ टक्केने वाढ झाली. 

 

नाशिक जिल्ह्यात झालेला एकूण पाऊस (मि.मी.)
> नाशिक ३७५.१     
> इगतपुरी ९६६.० 
> त्र्यंबक ४७४     
> दिंडाेरी १९५
> पेठ  ७८५     
> निफाड  ११४
> सिन्नर १८१    
>​​​​​​​ चांदवड ६५
>​​​​​​​ देवळा ५१.५    
> येवला २२८
> नांदगाव ५४    
> मालेगाव ११९
> बागलाण १०३    
> कळवण ४४ 
> सुरगाणा ४५१.६

बातम्या आणखी आहेत...