आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने लावली हजेरी; गंगापूर धरण क्षेत्रात २५ मिलिमीटर पाऊस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- तब्बल महिनाभराच्या विश्रांतीनंतर पुनरागमन केलेला वरुणराजा बुधवारी (दि. १९) सलग दुसऱ्या दिवशीही बरसला. दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान सुरू झालेल्या पावसाने चांगलाच जाेर धरला हाेता. दिवसभरात १५.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गंगापूर धरणाच्या क्षेत्रात २५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मंगळवारचा अनुभव पाठीशी असल्याने चाकरमान्यांनी छत्री आणि रेनकोट सोबत ठेवले. त्यामुळे सायंकाळी घरी जाताना कार्यालयात अडकून पडण्याची वेळ मात्र त्यांच्यावर आली नाही. 


ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा जाणवत आहे. उकाड्याने त्रस्त झालेल्या शहरवासीयांना मंगळवारच्या दमदार पावसाने दिलासा दिला. त्यानंतर बुधवारी पुन्हा आलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. ऐन गणेशोत्सवात पाऊस पडत असल्याने देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या गणेशभक्तांचा काहीसा हिरमाेड झाल्याचे चित्रही दिसून येत आहेे. 


शहरातील मध्यवस्ती, जुने नाशिकसह नाशिकरोड, जेलरोड, गंगापूर रोड, पंचवटी, सातपूर आणि सिडकोसह लगतच्या गावांमध्येही पावसाने दिलासा दिला. शहरातील रस्त्यांवरूनही पाणी वाहण्यास सुरुवात झाली होती. जमिनीत पाणी मुरल्यामुळे उकाडाही सायंकाळी कमी झाला होता. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ९५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणी असून बुधवारी झालेल्या पावसाने त्यात वाढ होईल. पुढील आठ दिवस वेधशाळेने पावसाचा अंदाज व्यक्त केला असून २२ सप्टेंबरला जोरदार पावसाचा अंदाज शहरासह जिल्ह्यात व्यक्त करण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...