आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२२ मंडलमध्ये १०० मिमीपेक्षा कमी, शहर, बार्शीमध्ये ४०० पेक्षा अधिक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- जिल्ह्यात यंदा पाऊस बार्शी तालुक्यावर काहीसा मेहेरबान झालेला दिसत आहे. तेथे सरासरीच्या तुलनेत ७९.४४ टक्के पाऊस झाला आहे. तर अन्य तालुक्यात सरासरीच्या तुलनेत ५० टक्केही झालेला नाही. पावसाळ्यातील तीन महिने संपल्यानंतर जिल्ह्यातील ११ पैकी पाच तालुक्यात ५० टक्केपेक्षा कमी, पाच तालुक्यात ५० ते ५२ टक्के तर बार्शी तालुक्यात ७९.४४ टक्के पाऊस झाला आहे. 


मंडलांची तुलना केल्यास २२ मंडलामध्ये १०० मिमी कमी पाऊस झाला आहे. ऑगस्टअखेर जिल्ह्यात ३०७ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असताना १६३.२६ मिमी पावसाची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. टक्केवारीत ऑगस्टअखेर जिल्ह्यात ४९ टक्के झाला आहे. जून महिन्यात ७६.४४ मिमी, जुलै महिन्यात ३२.३५ मिमी, तर ऑगस्ट महिन्यात ५२.३७ मिमी पाऊस झाला आहे. तीन महिन्यातील ही स्थिती पाहता आता जिल्ह्यातील रब्बीची आशा सप्टेंबरमधील परतीच्या पावसावरच अवलंबून असणार आहे. 


तालुकावार पाऊसमान (मिमीत) 
उत्तर सोलापूर : १९०.२४ (५१.२९ टक्के). पाच मंडलपैकी मार्डी मंडलमध्ये फक्त ३५.६२. सर्वाधिक ४०९.६० सोलापूर मंडल. शेळगी मंडलमध्ये २११.२०, वडाळा १८४.९०, तिऱ्हे ११२.९०. 
दक्षिण सोलापूर : १८५ (५०.०६ टक्के). सातपैकी दोन मंडलमध्ये १०० पेक्षा कमी. वळसंग मंडलमध्ये ७९ तर बोरामणी मंडलमध्ये ८२.५०. मुस्ती १२८, मंद्रूप २४१.१०, होटगी ३०७, विंचूर २१८, निंबर्गी २४३. 
बार्शी : सर्वाधिक २९७ (७९.४४ टक्के). बार्शी मंडलमध्ये सर्वाधिक ४४४. खांडवी २९५, आगळगाव ३०२, वैराग ३०६, उपळे दुमाला १६१, गौडगाव ३०६, पांगरी ३१८, पानगाव ३०८, नारी २४३, सुर्डी २८६. 
अक्कलकोट : १९३.८९ (४५.३९ टक्के). ९ मंडलपैकी सर्वाधिक पाऊस अक्कलकोट ३४६ व दुधनी २५६ येथे. जेऊर मंडलमध्ये सर्वात कमी ११३. तडवळ मंडलमध्ये ११६ तर करजगी मंडलमध्ये १२०. 
मोहोळ : १७६.४० (५२.६९ टक्के). कामती बु. मंडळमध्ये सर्वात कमी ४२. मोहोळ मंडलमध्ये सर्वाधिक २६३. इतर सहा मंडलमध्ये १७० ते २००. 
माढा : १२१ मिमी (४१ टक्के). ९ मंडलपैकी चार मंडलात १०० पेक्षा कमी. लऊळ ७८.५०, रोपळे क. ९१.६४, टेंभुर्णी ४१.३३, म्हैसगाव ३०.६२. जिल्ह्यातील सर्वात कमी पाऊस म्हैसगाव मंडलात. 
करमाळा : जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस १०२ येथे. आठपैकी चार मंडलमध्ये १००. केत्तूर ८७, जेऊर ७७, सालसे ९० व अर्जुननगर ३६. 
पंढरपूर : १५९.८९ (५०.२१ टक्के). पंढरपूर मंडलात १०२. इतर मंडलमध्ये १६५ ते २२०. 
सांगोला : १०५.७४ (४२.७५ टक्के). ९ मंडलपैकी पाच मंडलमध्ये १०० पेक्षा कमी. हतिद ६२, नाझरा ६५, संगेवाडी ९२, सोनंद ५४, जवळा ८८. महुद बु. मंडलात सर्वाधिक १७५. 
माळशिरस : १२०.२६ (५१.५१ टक्के). वेळापूर ८३, इस्लामपूर ३२ व दहिगाव ८०. पिलीव मंडलमध्ये सर्वाधिक २११. 
मंगळवेढा : १४०.५८ (४८ टक्के). सातपैकी दोन मंडलात १०० पेक्षा कमी. मरवडे ८९.५०, भोसे ९२. 


म्हैसगाव मंडलात सर्वात कमी ३० मिमी पाऊस 
उत्तर सोलापूर : मार्डी ३५.६२, दक्षिण सोलापूर : वळसंग ७९, बोरामणी ८२.५०, मोहोळ : शेटफळ ४२, माढा : दारफळ ७८.५०, रोपळे क. ९१.६४, टेंभुर्णी ४१.३३, म्हैसगाव ३०.६२, करमाळा : केत्तूर ८७, जेऊर ७७, सालसे ९०.७०, अर्जुननगर ३६, सांगोला : हातिद ६२, नाझरा ६५, संगेवाडी ९२.४०, सोनंद ५४, जवळा ८८, माळशिरस : वेळापूर ८३, इस्लामपूर ३२, दहिगाव ८०, मंगळवेढा : मरवडे ८९.५०, भोसे ९२. 

 

बातम्या आणखी आहेत...