Home | National | Other State | Raipur girl pihoo aka purnima sahu become daughter in law jharkhand cm raghuvar das today

मुख्यमंत्र्यांची सून बनली मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी, म्हणाली, सासरी गेल्यानंतर जशी आहे तशीच राहील

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 09, 2019, 03:39 PM IST

यपूर येथील राहाणार्‍या या मुलीच्या लग्नाची बोलणी फेसबूकच्या माध्यमातून झाली.

 • Raipur girl pihoo aka purnima sahu become daughter in law jharkhand cm raghuvar das today

  रायपूर (छत्तीसगड)- एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांची सून बनली आहे. रायपूर येथील राहाणार्‍या या मुलीच्या लग्नाची बोलणी फेसबूकच्या माध्यमातून झाली. 8 मार्चला मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव ललित यांची वरात निघाली. बड्या राजकाराणी घराण्याची सून झाल्यानंतरही जशी आहे तशीच राहील असे नववधुने म्हटले आहे.

  - रायपूरची पीहू अर्थात पोर्णिमा साहू हिचा विवाह झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांची सून बनली. शुक्रवारी पोर्णिमा आणि ललित यांचा विवाह पार पडला. मुख्यमंत्र्यांनी पाहुण्यासाठी रेल्वेच्या तीन डबे बुक केले होते.
  - पोर्णिमा ही एका सामान्य कुटुंबातील मुलगी आहे. या विवाहामुळे ती प्रचंड एक्साइटेड आहे. पीहूला प्रत्येकजण शुभेच्छा देत आहे.
  - पीहूचे वडील भागीरथी साहू यांचा छोटासा बिझनेस आहे तर आई कौशल्या साहू या शिक्षिका आहे. पीहूने महंत लक्ष्मी नारायण दास कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. शिक्षण घेत असताना तिने एका शाळेत नोकरीही केली. व्हीआयपी रोडवरील एका हॉटेलमध्ये पीहू आणि ललित सात फेरे घेतले.

  27 जानेवारीला झाला होता साखरपुडा
  - ललित दास आणि पोर्णिमा यांचा साखरपुडा हॉटेल वेव इंटरनॅशनलमध्ये 27 जानेवारीला झाला होता. ललित दास यांनी रांची येथील बीआयटी मेसरामधून शिक्षण पूर्ण केले. टाटा स्टील कंपनीत एचआरएम विभागात असिस्टेंट मॅनेजरच्या पोस्टवर ते कार्यरत आहे.

Trending