आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीएससीत पदरी निराशा आली, मग पती-पत्नीने प्रिंट केल्या 5 कोटींच्या बनावट नोटा, शिक्षणादरम्यान झाले प्रेम, मग केले लव्ह मॅरेज, महिलाच निघाली मास्टरमाइंड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर - अमलीडीहच्या रजत अपार्टमेंट येथील फ्लॅट नंबर 708 मध्ये शनिवारी रात्री छापा मारून पोलिसांनी 5 कोटी रुपयांच्या नकली नोटा जप्त केल्या. सर्व नोटा 2 हजार रुपयांच्या आहेत. ज्या दांपत्याच्या फ्लॅटवर धाड टाकण्यात आली ते दोघेही यूपीएससीची तयारी करत होते. फ्लॅटमध्ये किरायाने राहत होते. त्यांनी 3 महिन्यांत 2 हजारांच्या 25 हजार नोट छापल्या. राज्यात आतापर्यंत नकली नोटा पकडण्याचे हे सर्वात मोठे प्रकरण आहे. या अटकेमुळे कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर)च्या नावावर करण्यात येत असलेला घोटाळाही उघड झाला आहे.

हे दांपत्या कंपन्यांच्या एजंटांना बहाणा करायचे की, ते सीएसआरची रक्कम त्यांच्या फंडमध्ये जमा करतील. विश्वास ठेवण्यासाठी नोटांनी भरलेली बॅगही त्यांना दाखवायचे, परंतु त्यातील नोटा या नकली असायच्या. फसवणुकीचा हा गोरखधंदा केल्याच्या आरोपात पोलिसांनी निखिल सिंह (29) आणि पूनम अग्रवाल (30) यांना अटक केली आहे. निखिल पाटणा (बिहार) चा आहे आणि त्याने 4 वर्षांपूर्वी बिलासपूरच्या पूनमशी प्रेमविवाह केला होता. प्राथमिक चौकशीत पोलिसांना माहिती मिळाली आहे की, या दांपत्याने अर्धा डझन कंपन्यांशी संपर्क केला होता. सध्या दांपत्याद्वारे 1 कोटी रुपयांच्या फसवणुकीची माहिती उघड झाली आहे. याची मास्टर माइंड पूनमच आहे. या दांपत्याच्या फ्लॅटमधून कलर प्रिंटर, लॅपटॉप, कटर आणि कागदाचे बंडलही जप्त करण्यात आले आहे.


फ्लॅट सोडून हॉटेलमध्ये गेले पळून
आरोपींना छाप्याची कुणकुण लागली होती. यामुळे फ्लॅटला कुलूप लावून दोन-तीन साथीदारांसह ते व्हीआयपी रोडवरील एका हॉटेलमध्ये गेले. परंतु पोलिसांना त्यांचा ठावठिकाणा कळलाच. पोलिस हॉटेलमध्ये गेले, तेथे दोघांना जेरबंद केले. फ्लॅट सोडताना या दांपत्याने काही नकली नोटा सोबत नेल्या होत्या आणि काही रायपूरच्या एका फार्महाऊसमध्ये लपवल्या होत्या. त्यासुद्धा जप्त करण्यात आल्या आहेत.


मंत्री-अधिकाऱ्यांची घालायचे भीती
चौकशीत कळले आहे की, पूनम स्वत:ला राज्यातील मंत्री व अधिकाऱ्यांच्या जवळची सांगायची. यामुळे एजंटही तिला घाबरायचे. पूनमचे वडील बिलासपूरमध्ये लोखंडाचा व्यवसाय करतात. निखिलचे वडील एका कारखान्यात काम करतात. या दांपत्यासेाबत आणखी  4 जण यात सामील होते. पैकी दोघांना पोलिसांनी पकडले आहे. परंतु अटकेची कुणकुण लागताच इतर दोघे पळून गेले.

 

दिल्लीला शिक्षणासाठी गेले, बनावट नोटा अन् सीएसआर फंड घोटाळ्याची आयडिया घेऊन परतले...
अॅडिशनल एसपी प्रफुल्ल ठाकूर म्हणाले की, निखिल आणि पूनम दिल्लीत भेटले होते. दोघेही यूपीएससीची तयारी करत होते. दोघांनी तेथेच लग्न केले. 6 महिन्यांपूर्वी ते रायपुरात शिफ्ट झाले. नोटा प्रिंट करणे आणि गंडवण्याची आयडिया त्यांनी दिल्लीतच शिकली होती. पूनमने सीएसआर फंडमध्ये घोटाळा करण्याची पद्धतही शिकून घेतली. रायपुरात येऊन या दांपत्याने एक कलर स्कॅनर खरेदी केले आणि 2 हजारांच्या नव्या नोटांना स्कॅन करून प्रिंट करायला सुरुवात केली. नोटांची ते स्वत:च कटिंग करून बंडल बनवायचे.

 

सीएसआर फंडमध्ये घोटाळा करणाऱ्या दलालांना नोटा दाखवून एनजीओच्या खात्यात पैसे टाकायला लावायचे...
हे दांपत्य कंपन्यांचे अधिकारी अथवा त्यांच्या एजंटांना संपर्क करायचे. मग म्हणायचे की, सीएसआरमध्ये ते जेवढा खर्च दाखवतील त्याच्या 80% त्यांना परत मिळेल आणि खर्च कंपनीच्या खात्यातही दिसेल. रक्कम जमा करण्यासाठी आरोपी कंपन्यांना एनजीओ आणि ट्रस्टचा अकाउंट नंबर द्यायचे. आरोपी कंपन्यांचा पैसा जमा झाल्याच्या 24 तासांच्या आत कॅश देण्याचे आमिष दाखवायचे. एजंटांनी चौकशी केल्यावर त्यांना बनावट नोटांनी भरलेली बॅग दाखवली जात होती. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos... 

 

बातम्या आणखी आहेत...