आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Raisen News: Woman With 2 Year Old Jumped In Water To Commit Suicide To Avoid Domestic Fights Saved By Youth

कौटुंबीक जाचाला वैतागून महिलेने मुलाला ओढणीने बांधून तवालात मारली उडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायसेन (मध्य प्रदेश) - रविवारी दुपारी एका महिलेने कौटुंबिक त्रासाला कंटाळून साडेतीन वर्षांच्या मुलाला ओढणीने बांधून आत्महत्या तलावामध्ये उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.  एका मच्छीमाराने त्या स्त्रीला आणि तिच्या मुलाला पाण्याबाहेर काढत त्यांचे प्राण वाचविले. रिंकी वाल्मिकी (23) असे या महिलेचे नाव असून जिल्ह्यातील राहूल नगर येथील रहिवासी आहे.

 

तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी पोलिन घटनास्थळी येईपर्यंत महिलेला सुरक्षेसाठी घटनास्थळी थांबवून ठेवले होते. दरम्यान आपल्या मुलाल सुरक्षित पाहून छातीशी लावून रडत होती.  घटनेच्या बऱ्याच कालांतराने पोलिन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनतर रिंकीला तिच्या मुलासोबत पोलिस ठाण्यात आणण्यात आले. दरम्यान मुलाच्या आरोग्याकडे पाहता त्याला तपासणीसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

 

मच्छीमाराने वाचवले महिलेचे प्राण
मच्छीमार नसीम खान यांनी सांगितले की, दुपारी साडे बाराच्या सुमारास मासे पकडत असताना एक महिला तिच्या मुलासोबत तलावाजवळ आली. नंतर तिने मुलाला ओढणीने बांधून पाण्यात उडी घेतली. मी तात्काळ तलावात उडी मारून दोघांना बाहेर काढले.

 

बातम्या आणखी आहेत...