आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्या मुलीला वेळ देऊ शकले नाही तिने लिहिली ऑटोबायोग्राफी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमचे वडील कामात व्यग्र असायचे. सकाळी जायचे ते उशिरा रात्री यायचे. त्यांच्याकडे आमच्यासाठी वेळ नव्हता. ते त्यांच्या कामाबाबत खूप वेडे होते. दुसऱ्या दिवशी आम्ही शाळेत निघून जायचो. महिनोमहिने आमची भेट होत नव्हती. आम्ही त्यांच्याशी चिठ्ठ्याच्या माध्यमातूनच बोलायचो. मला पियानो पाहिजे होता, त्यावेळी मी उशीखाली चिठ्ठी लिहून ठेवली होती. कधी कुठे जायचे असेल तर चिठ्ठीच्या माध्यमातून सांगायचे. वडील त्यांचे करिअर करण्यात व्यग्र होते. मला मुलगी म्हणून लहानपणी आणि तरुणपणी त्यांना भेटण्याची कमी संधी मिळाली. त्यावेळी आम्ही लहान होतो, त्यामुळे त्यांना वाढदिवसाचे गिफ्ट काय द्यावे काही कळत नव्हते. माझे लग्न खूप लवकर झाले, त्यामुळे मी दिल्लीला आले होते. त्यावेळचा काळ वेगळा होता. आम्ही चित्रपटसृष्टीत येणाचा विचारही केला नाही. लग्नानंतर निकिताशा कंपनीत काम करत होती. ती कंपनी बंद झाली तर एलआयसीमध्ये काम करू लागली. नवल म्हणजे, लहानपणी ज्या मुलीला ते वेळ देऊ शकले नाही, त्याच मुलीने त्यांच्या निधनानंतर संशोधन करून त्यांची ऑटोबायोग्राफी लिहिली. आम्हाला जरी लहानपणी त्यांचा सहवास कमी लाभला तरीदेखील त्यांनी माझे लग्न धुमधडाक्यात लावून दिले होते. यात संपूर्ण चित्रपटसृष्टी सहभागी झाली होती. ते स्वत: सर्व कलाकारांना, वऱ्हाडीमंडळींना जेवण वाढत होते. सर्वजण मिळून काम करत होते. आपल्याच मुलींचेच लग्न आहे, असे समजून सर्वजण काम करत हाेते. लग्नानंतर मी दिल्लीला आले. माझे विश्वच वेगळे झाले. मी एका उद्याेजकाची पत्नी झाले. वडिलांना त्यांचा वाढदिवस साजरा करायला आवडायचे. आर के. स्टुडिओमध्ये कार्यक्रमाची धूम असायची. त्यावेळी ते कर्मचाऱ्यांसाठी खेळाचे आयोजन करायचे. त्यांना बक्षीस द्यायचे. चित्रपटाचे मुहूर्तही करायचे. वाढदिवस कामगारांसोबत साजरा करायचे. रात्री ते आपल्या जवळचे मित्र आणि सहकाऱ्यांसोबत वाढदिवस साजरा करायचे. सुरूवातीला चित्रपटाच्या मुहूर्ताचा शॉट आजोबा करायचे. आजोबांकडून मंत्रोच्चारण करून नंतर ओम नम: शिवाय म्हणायचा शॉट प्रसिद्ध आहे, जो िवशेषत: वडिलांच्या वाढदिवसाच्या दिवशीच केला जायचा.  त्यांच्यावर आमच्या आजोबांचा खूप प्रभाव होता. आजोबांनी त्यांना कधी जास्तीचा एेषोआराम दिला नाही. ते शाळेत नेहमी ट्रेनने जायचे. एकदा खूप जोरात पाऊस पडत होता. आजी आजोबांना म्हणाली, गाडीने पाठवू या, परंतु आजोबांनी नकार दिला. भर पावसात त्यांना जायला सांगितले. त्यांचे म्हणणे होते की, जर मुले आताच कठीण परिस्थितीचा सामना करू शकले नाहीत तर पुढच्या आयुष्यात अडचणींचा सामना कसा करतील. त्याच धर्तीवर वडिलांनी आमचे पालनपोषण केले. एकदा लहानपणी आजोबांनी वडिलांना पाण्यात टाकले होते. त्यावेळी त्यांना पोहायला येत नव्हते. ते रडायला लागले, परंतु आजोबा थांबले नाहीत. लोकांना आश्चर्य वाटले, परंतु आजोबांचे म्हणणे होते, हात पाय मारू द्या. पोहायला येईल आणि झालेही तसेच. वडील पोहायला शिकले. या कडक शिस्तीमुळेच ते जबाबादार बनले. आजोबांनी एकदा खूप कर्ज घेतले हेाते तेव्हा वडिलांनी ते सर्व कर्ज फेडले. सर्वांची जबाबदारी मोठ्या हिम्मतीने पेलली. कर्जाचा एक-एक रुपया फेडला. त्यांच्या बालपणी त्यांच्यावर जे संस्कार झाले किंवा ज्या गोष्टीमुळे ते प्रभावित झाले त्या गोष्टीवर त्यांनी चित्रपट बनवले. उदा- एकदा त्यांच्या बालपणी त्यांच्या स्वप्नात एक महिला पांढरी साडी घालून आणि केसात गजरा लावून आली होती, ती त्यांच्या मनात अशी बसली की त्यांच्या प्रत्येंक चित्रपटात हिरोइन त्याच रूपात सादर व्हायच्या, म्हणजे त्याच पांढरी साडी दिसायच्या. िशवाय बाॅबीमध्ये त्यांनी गरीब-श्रीमंतामधील दरी दाखवण्याचा प्रयत्न केला. याचाही अनुभव त्यांना बालपणीच आला असावा.  सोव्हिएत संघटनांचे विभाजन होण्यापूर्वी, ते जगभरातील काही प्रसिद्ध निर्मात्यांचा सन्मान करू इच्छित होते.  बर्गमन, मर्लिन मनरो, चार्ली चॅपलिन यांच्यासोबतच वडीलांचेही नाव त्या यादीत होते. 

ऋतु नंदा, राज कपूर यांची मोठी मुलगी आणि त्यांच्या पुस्तकाची लेखिका