Home | Flashback | raj kapoor was angry when family members sold his old car

आपली पहिली कार विकल्यावर चिडले होते राज कपूर, म्हणाले होते- मी म्हातारा झाल्यावर मलाही विका? वयाच्या दहाव्या वर्षीच चित्रपटसृष्टीत आले होते शोमॅन

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 15, 2018, 12:34 PM IST

दोन लाख रुपयात त्यांनी बनवला होता पहिला चित्रपट आणि कमावला खूप नफा..

 • raj kapoor was angry when family members sold his old car

  मुंबई : बॉलिवूडचे शोमॅन राज कपूर जर जिवंत असते तर ते ९४ वर्षांचे झाले असते. 14 डिसेंबर 1924 ला पेशावर (पाकिस्तान) मध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी अवघ्या 22 व्या वर्षी आपला पहिला चित्रपट प्रोड्युसही केला आणि त्याचे डायरेक्शनही केले. एवढेचयह नाही तर 25 व्या वर्षी RK स्टुडिओजचे मालक झाले होते आणि त्यावेळी त्यांनी 'आवरा' सारखा यशस्वी चित्रपट बनवला होता. राज कपूरने आपल्या पहिल्या कारला खूप सांभाळून ठेवले होते आणि जेव्हा त्यांना न विचारता त्यांची कार विकली गेली तेव्हा ते खूप भडकले. राज कपूरला सांगितले गेले की त्या कारचा वापर कधी बंद झाला आहे आणि आता त्या कारचे स्पेअर पार्टसही मिळत नाहीत. ती कार उगीच घरात अडचण बनून राहिली होती म्हणून ती विकून टाकली.

  कार विकल्यावर राज कपूर भडकून म्हणाले असे काही..

  आपली पहिली कार विकल्यामुळे नाराज असलेले राज कपूर म्हणाले होते, "एक दिवस मीसुद्धा म्हातारा आणि निरुपयोगी होईन. तेव्हा मलाही असेच भंगारवाल्याकडे विकले जाईल." राज कपूर चित्रपटात अभिनय करून त्या पैशांवर आपला पहिला चित्रपट बनवत होते. त्या काळामध्ये कार अत्ताच्याइतकी सहज मिळत नव्हती. वास्तविक राज कपूरचे सासरे रिवा स्टेटचे आयजी होते. त्या फोर्ड कारला राज कपूरने त्याकाळी 9 हजार रुपयांना रिवामधून खरेदी केले होते. त्याचे रजिस्टरशन होते रिवा 347.

  पुढील स्लाईडवर पहा कसा बनला राज कापूरचा पहिला चित्रपट..

 • raj kapoor was angry when family members sold his old car

  राज कपूर यांनी दोन लाखात बनवला होता आपला पहिला चित्रपट.. 

   

  राज कपूरने पाला पहिला चित्रपट 'आग' फक्त दोन लाख रुपयात बनवला होता आणि त्यावर त्यांना 25 हजार रुपयांचं नफा झाला होता. त्या काळामध्ये ती खूप मोठी रक्कम होती. खरे तर आता राज कपूरचा नातू रणबीर कपूरला एका चित्रपटाचेच कोट्यवधी रुपये मिळतात. आग हा चित्रपट 1948 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्यावेळी एक डॉलर म्हणजे एक रुपया असायचा. आज मात्र एका डॉलरची किंमत 70 रुपये आहे.  

   

  वयाच्या दहाव्या वर्षीच चित्रपटात आले राज कपूर.. 

   

  स्वर्गीय राज कपूर दिलीप कुमारांचे खूप चांगले मित्र होते. वास्तविक दिलीप साहेबांनी राज कपूरनंतर चित्रपटसृष्टीत एंट्री घेतली होती. राज कपूर यांनी मात्र वयाच्या दहाव्या वर्षी म्हणजेच 1935 साली चित्रपट 'इन्कलाब' मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. दिलीप कुमार यांनी 1944 मध्ये 'ज्वारभाटा' हा पहिला चित्रपट केला. 

   

  पुढील स्लाईडवर पहा कशी होती राज-दिलीप यांची मैत्री.. 

   

 • raj kapoor was angry when family members sold his old car

  दिलीप कुमारांचे पक्के मित्र होते राज कपूर.. 

   

  दिलीप कुमार यांनी एक मुलाखतीत सांगितले होते की, चित्रपटांमध्ये येण्यासाठी त्यांना राज कपूर यांनीच प्रेरणा दिली. यावेळी दिलीप कुमार यांनी राज आणि आपल्या मैत्रीविषयी सांगितले होते की, "कॉलेज सुरु असताना मी आणि राज मित्र बनलो होतो. आम्ही दोघे एकाच शहरात जन्मलो. त्यावेळी जेव्हा आम्ही सोबत सॉकर खेळायचो. राज मला म्हणाला होता तू चित्रपटांमध्ये ये. पण मी त्याला नकार दिला होता. आणि त्याला सांगितले, 'तू जा, तुझे वडील पण करत आहेत. तुही चित्रपट काम कर' त्यानंतर जेव्हा मी राज कपूरला पहिल्यांदा स्टुडिओत भेटलो तेव्हा ते म्हणाले, 'बघितलंस,मी म्हणालो होतो की तू चित्रपांमध्ये येशील.' वास्तविक मी तेव्हा एका वेगळ्या कामासाठी तेथे गेलो होतो. ते अशी व्यक्ती होते ज्यांनी मी चित्रपटसृष्टीत नातानाही माझी साथ दिली. नंतर मी चित्रपटात प्रवेश केल्यावर त्यांनी दरवाज्यावरच माझे स्वागत केले. आमचे नाते खूप चांगले होते." 

Trending