आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज नव्हे आता जयदेवांनी रेखाटले व्यंगचित्र.. धनुष्यबाण आणि त्यामध्ये बाळासाहेबांची प्रतिमा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आगामी पंतप्रधान कोण होईल हे सांगता येणार नाही, असे वक्तव्य योगगुरू रामदेवबाबा यांनी नुकतेच केले. या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून मोदी आणि राहुल गांधी यांच्यावर कटाक्ष केला आहे. दुसरीकडे, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना त्यांचे पुत्र जयदेव ठाकरे यांनी व्यंगचित्र रेखाटले आहे.

 

जयदेव ठाकरे यांनी व्यंगचित्रात धनुष्यबाण आणि त्यामध्ये बाळासाहेबांची प्रतिमा रेखाटून वडिलांना मानवंदना दिली आहे. जयदेव ठाकरे हेदेखील अधून मधून व्यंगचित्र रेखाटतात. मात्र, जयदेव यांनी अनेक वर्षांनंतर व्यंगचित्र रेखाटल्याने सध्या हा चर्चेचा विषय ठरला आहे.

 

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीवरून उद्धव आणि जयदेव यांच्या वाद सुरु झाले होते.  बाळासाहेबांच्या निधनानंतर मृत्यूपत्रावर उद्धव ठाकरे यांनी त्यांची खोटी सही करून संपत्तीवर कब्जा मिळवला, असा आरोप जयदेव ठाकरेंनी केला होता. जयदेव यांनी कोर्टातही धाव घेतली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांनी संपत्तीबाबत हायकोर्टात दाखल केलेली याचिका मागे घेतली होती.

 

 

बातम्या आणखी आहेत...