आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आपल्या देशात हिंदू परंपरेत मंदिरांना अनन्य असे स्थान आहे. त्यामुळे देशाच्या कान्याकोपऱ्यात लाखोंच्या संख्यने मंदिरे आढळतात. यापैकी काही मंदिरे त्यांच्यामागील हजारो वर्षांच्या इतिहासामुळे तर काही मंदिरे विचित्र रहस्यांमुळे प्रसिद्ध आहे. सध्या बिहारमधील असेच एका मंदिरातील रहस्याने सर्वांना गोंधळात टाकले आहे. या मंदिरातील मूर्ती चक्क आपआपसांत संवाद साधतात.
राज राजेश्वरी त्रिपूर सुंदरी मंदिर-
बिहारमधील बक्सर येथील राज राजेश्वरी त्रिपूर सुंदरी असे या मंदिराचे नाव आहे. या राज राजेश्वरी मंदिराजवळून जाणाऱ्या प्रत्येकाला आवाज येत असल्याचा दावा केला जातो. भारतातील महत्त्वाच्या शक्तीपीठांपैकी एक असलेले हे मंदिर आपल्या याच रहस्यामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. जवळपास 400 वर्षांपूर्वी भवानी मिश्र नावाच्या व्यक्तीने या मंदिराची निर्मिती केली होती. तेव्हापासून या मंदिरात देवाची पुजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होते अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. या मंदिराचे खास वैशिष्टे म्हणजे येथील मूर्ती. अनेकांनी दावा केल्यानुसार, रात्रीच्या वेळी या मंदिरातील मूर्ती आपआपसांत संवाद साधतात. त्यामुळे रात्री मंदिराच्या जवळून जाताना प्रत्येकाच्या मनात धडकी भरते.
वैज्ञानिकांनी सांगितल्यानुसार, मंदिराच्या परिसरात काही विशिष्टप्रकारचे शब्द ऐकू येतात. यामागचा शोध घेण्यासाठी या ठिकाणी संशोधकांची टीमही पोहचली होती. अनेक दिवस त्यांनी बारकाईने अभ्यास करुन सांगितले की, येथे रात्रीच्या शांततेमुळे तिथे वातावरणातील ध्वनीलहरींचा आवाज येतो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.