आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला बंधू राज ठाकरेंची उपस्थिती, फोन करुन भावाला दिले होते निमंत्रण  

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ठाकरे घराण्यातील पहिला व्यक्ती मुख्यमंत्रिपदावर विराजमान होणार आहे

मुंबई- आज महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक दिवस आहे. ठाकरे घराण्यातील पहिला व्यक्ती राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळणार आहे. या आनंदी क्षणांचा साक्षीदार होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आपले बंधु आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रण दिले होते. ते आता राज ठाकरे मान्य केले आहे आणि आज होणाऱ्या शपथ विधीला ते उपस्थित राहणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवतीर्थ म्हणजेच शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत.



एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचा शब्द उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिला होता. ही वचनपूर्ती खुद्द उद्धव ठाकरे यांच्या रुपाने होणार आहे. कारण थेट शिवसेना पक्षप्रमुखच मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसणार आहेत. सोबतच आदित्य ठाकरे यांच्या रुपानेही ठाकरे घरण्यातील पहिला व्यक्ती निवडणूक सक्रिय राजकारणात सहभागी झाला आहे. राज ठाकरे शिवाजी पार्क परिसरात असलेल्या त्यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी राहतात. त्यामुळे शपथविधीला ते पत्नी, मुलगा, सून, मुलगी आणि मातोश्री यांच्यासह उपस्थित राहतील, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे.



आज होणार ऐतिहासिक शपथविधी
 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून आज सायंकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी शिवाजी पार्कवर शपथ घेणार आहेत. ठाकरे यांच्याशिवाय शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या प्रत्येक दोन नेत्यांना राज्यपाल मंत्रिपदाची शपथ देतील. या सरकारमध्ये एकच उपमुख्यमंत्री असेल, ते पद राष्ट्रवादीकडे असेल. तर विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला, उपाध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळेल, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी महाविकास अाघाडीच्या बुधवारी रात्री बैठकीनंतर दिली.

सोनिया, मोदी यांना निमंत्रण


आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांना शपथविधीचे निमंत्रण दिले. उद्धव ठाकरेंनी फोनवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, बंधू राज ठाकरेंनाही निमंत्रण दिले. मोदींनी उद्धव यांचे अभिनंदन केले. राहुल गांधी, चंद्राबाबू नायडू, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, विविध देशांच्या राजदूतांसह देशभरातील दिग्गज नेत्यांना निमंत्रण दिले आहे.

संभाव्य खातेवाटप
 
उद्धव ठाकरे - मुख्यमंत्री जयंत पाटील - उपमुख्यमंत्री/अर्थ एकनाथ शिंदे - सार्वजनिक बांधकाम रवींद्र वायकर - नगरविकास सुभाष देसाई - उद्योग अब्दुल सत्तार - अल्पसंख्याक उदय सामंत - गृहनिर्माण जितेंद्र आव्हाड - वैद्यकीय शिक्षण नवाब मलिक - कामगार धनंजय मुंडे - कृषी बाळासाहेब थोरात - महसूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण विधानसभा अध्यक्ष


कुणाला किती पदे....
15 - शिवसेना 15 - राष्ट्रवादी 13 - काँग्
रेस