mahaelection / EVM विरोधी रॅलीत राज ठाकरे, अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर येण्याची शक्यता


विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी विरोधी पक्षांची आहे

दिव्य मराठी

Jul 19,2019 02:28:31 PM IST

मुंबई- क्रांती दिनी म्हणजेच 9 ऑगस्टला इव्हीएम विरोधात सर्व विरोधीपक्ष आणि संघटनां मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. विरोधकांच्या या मोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा येणार असल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमविरोधी भूमिका आणखी तीव्र झाली, त्यामुळे मोर्चात प्रमुख विरोधी पक्ष सहभागी होणार आहेत.


विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी विरोधी पक्षांची आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएम विरोधी भूमिका अनेकवेळा जाहीर बोलून दाखवली आहे. त्यामुळेच आता ईव्हीएमविरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चात राज ठाकरे, अजित पवार, प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर येणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

राज ठाकरे यांनी इव्हीएमच्या मुद्यावर केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती, तसेच बॅलेज पेपरद्वारे मतदान घेण्याची मागणी निवडणूक आयुक्तांकडे केली होती. या भेटीनंतर राज ठाकरेंनी थेट सोनिया गांधींच भेट घेतली. इव्हीएम विरोधात देशव्यापी आंदोलन उभे राहण्याची गरज असल्याची भूमिका त्यावेळी राज ठाकरे यांनी मांडली होती,

X