शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदे / शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदे फेकून स्वतःचे नुकसान करण्यापेक्षा राज्यकर्त्यांना बेशुद्ध पडेपर्यंत कांदे मारा, राज ठाकरेंचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सल्ला

Dec 19,2018 07:50:00 PM IST

कळवण : शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदे फेकून स्वतःचे नुकसान करण्यापेक्षा राज्यकर्त्यांना बेशुद्ध पडेपर्यंत कांदे मारा आणि तोच कांदा फोडून त्यांच्या नाकाला लावा. तेव्हाच बेशुद्ध झालेल्या सरकारला शुद्ध येईल असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केले. कळवण तालुका दौऱ्यादरम्यान ते शेतकऱ्यांशी चर्चा करत होते.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची भाजपा सरकारकडून होणारी अवहेलना लक्षात घेत राज ठाकरे यांनी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करण्यासाठी दौरा सुरू केला आहे. या दौऱ्याची सुरुवात नाशिकच्या ग्रामीण भागापासून केली आहे. आज कळवण तालुका दौऱ्यादरम्यान ठाकरेंनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. यादरम्यान शेतकऱ्यांना धीर देत कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आगामी आठवड्यात मुंबई येथे येण्याचे आवाहन केले. मी आपल्या सोबतीने मुख्यमंत्र्यांना जाब विचारेल असे त्यांनी यावेळी सांगितले.

याशिवाय कांद्याला हमीभाव व नुकसान झालेल्या कांद्याला अनुदान मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले.

X