आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमितच्या लग्नाला नरेंद्र मोदींना बोलवणार का? या प्रश्नावर राज ठाकरे यांनी दिले हे उत्तर...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- राम मंदिरावरुन दंगली घडवण्याचा सरकारचा कट आहे. सरकारकडे रुपयाही शिल्लक नसून केवळ घोषणाबाजी सुरु आहे, असं सांगतानाच पैसा नाही, मग कशाच्या जोरावर कांद्याला अनुदान जाहीर केलं? असा सवालही राज ठाकरेंनी विचारला. काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा आताचे सरकार बेक्कार असल्याचा टोलाही राज यांनी यावेळी लगावला. 

 

अमितच्या लग्नाला पंतप्रधान मोदींना बोलवणार का?
अमितच्या लग्नाला पंतप्रधान मोदींना बोलवणार का? पत्रकारांना विचारलेल्या या प्रश्नाला मात्र राज ठाकरे यांनी मिश्किलपणे उत्तर दिले. 'मोदींचा लग्नावर विश्वास आहे का?' असे राज ठाकरे यांनी उत्तर दिले.

 

राज ठाकरे यांनी नुकताच नाशिकचा दौरा केला. दौऱ्यानंतर राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला.  नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे राज यांनी सांगितले. या गर्दीवरुन जनतेचा शिवसेना-भाजपवरील विश्वास उडाल्याचे दिसत असल्याचे राज ठाकरे म्हणाले. येत्या निवडणुकीत शिवसेना-भाजपची दुर्दशा होईल, असे भाकितही त्यांनी यावेळी वर्तविले.

 

जनतेने मोदींवरचा राग मतांच्या माध्यमातून व्यक्त केला..

मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. हा मोदींवरचा राग आहे. जनतेने आपला राग मतांच्या माध्यमातून व्यक्त केला, अशी खोचक टीकाही राज ठाकरे यांनी केली. राज यांनी मोबाईल कॉल आणि इंटरनेट डेटावरील सरकारी पहाऱ्यावर संताप व्यक्त केला. मोदींनी आधी जगतेच्या घरातील पैसे काढले, आता लोकांच्या घरात घुसणार का? असा सवाल उपस्थित केला.

 

फावडे -कुर्‍हाड एकाचवेळी पायावर मारुन घेण्यासारखं..

लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी होणार नाहीत, असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे. लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र घेणे म्हणजे भाजपसाठी फावडे -कुऱ्हाड एकाचवेळी पायावर मारुन घेण्यासारखं आहे.

 

अम‍ितचे लग्न अत्यंत साधेपणाने होणार..

मुलगा अमितचे लग्न अत्यंत साधेपणाने होणार असल्याचेही राज ठाकरेंनी यावेळी सांगितले. सर्वपक्षांच्या हितचिंतकांना आमंत्रण दिले, तर तो आकडा सहा लाखांच्या घरात जातो. त्यामुळे उगाच वधू-वराची ससेहोलपट नको. म्हणून मोजक्याच लोकांना निमंत्रण दिल्याचेही राज म्हणाले.

 

बातम्या आणखी आहेत...