आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतमाता यंदा ओवाळणार नाही, भाऊबीजेलाही राज ठाकरेंचा भाजपवर व्यंगचित्राच्या माध्यमातून हल्लाबोल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज ठाकरे दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर एकापाठोपाठ एक भाजपवर हल्ला चढवत आहे. नरक चतुर्दशीपासूनच राज ठाकरे भाजपवर त्यांच्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून आतषबाजी करत आहेत. आता भाऊबीजेच्या मुहूर्तावरही राज ठाकरेंनी त्यांची ही आतषबाजी सुरू ठेवली आहे. भारतमाता बहीण आणि मोदींनी भाऊ दाखवत राज ठाकरे यांनी यंदा भारतमाता तुम्हाला ओवाळणार नसल्याचा टोला लगावला आहे. म्हणजेच आगामी निवडणुकीत लोक पुन्हा निवडून देणार नाहीत, असे म्हटले आहे. 


याआधी राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी व्यंगचित्राच्या माध्यमातून निशाणा साधला होता. राज यांनी लक्ष्मीपूजन या शीर्षकाखाली व्यंगचित्र रेखाटून ते फेसबूकपेजवर पोस्ट केले होते. तसेच अभ्यंगस्नानाचे व्यंगचित्र काढून मुख्यमंत्री फडणवीसांवर ही हल्ला चढवला होता. 

 

बातम्या आणखी आहेत...