Home | Maharashtra | Mumbai | Raj Thackeray cartoon slamming against BJP and Devendra fadanvis

'साहेब...अख्खा महाराष्ट्र तुम्हाला 'धुवायला' आलाय! पाठवू?... पुन्हा एकदा राज ठाकरेंचे फडणवीस सरकारवर फटकारे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 06, 2018, 03:04 PM IST

महाराष्ट्रातील जनता सरकार आणि मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवर नाराज आहे.

 • Raj Thackeray cartoon slamming against BJP and Devendra fadanvis

  मुंबई- राज ठाकरेंनी दिवाळीनिमित्त व्यंगचित्रांच्या माध्यमातून भाजप आणि फडणवीस सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. राज यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर तीन व्यंगचित्र पोस्ट केले आहेत. त्यापैकी एका व्यंगचित्रात 'साहेब..अख्खा महाराष्ट्र तुम्हाला 'धुवायला' आलाय! पाठवू?' अशा शब्दांत राज यांनी देवेंद्र फडणवीसांवर खोचक टीका केली आहे.

  अभ्यंगस्नानाचे व्यंगचित्र
  > महाराष्ट्रातील जनतेची सरकारआणि मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवर असलेली नाराजी पाहून राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचे अभ्यंगस्नानाचे व्यंगचित्र रेखाटले आहे. या व्यंगचित्रात फडणवीस आणि एक व्यक्ती रेखाटला आहे. तो फडणवीसांना 'साहेब...अख्खा महाराष्ट्र तुम्हाला 'धुवायला' आलाय! पाठवू?' असे लिहित फडणवीस यांना चिमटा काढला आहे.

  पुढच्या स्लाइडवर वाचा- नरकचतुर्दशीच्या निमित्ताने राज ठाकरेंनी रेखाटलेले व्यंगचित्र..

 • Raj Thackeray cartoon slamming against BJP and Devendra fadanvis

  नरकचतुर्दशी
  > या व्यंगचित्रात राज ठाकरेंनी अमित शहांवर निशाणा साधला आहे. त्यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रात 'भाजपाला पडलेले दिवाळी पहाटेचे स्वप्न', अशा शब्दांत  भाजप आणि अमित शहांवर खोचक टीका केली आहे.

   

  पुढील स्लाइडवर वाचा- धनत्रयोदशीच्या निमित्ताने राज ठाकरेंनी रेखाटलेले व्यंगचित्र

 • Raj Thackeray cartoon slamming against BJP and Devendra fadanvis

  धनत्रयोदशी
  > या व्यंगचित्रात राज ठाकरेंनी 'हा दिवस अनेक प्रकारे साजरा केला जातो.  वैद्यकीय शास्त्राचा देव धन्वंतरी यांचा जन्मदिवस म्हणूनही काही लोक हा दिवस महत्त्वाचा मानतात!' असे म्हटले आहे. या व्यंगचित्रात त्यांनी भाजप सरकारला धारेवर धरत लिहिले आहे की, 'काळजीचे कारण नाही! परंतु गेल्या चार साडेचार वर्षांत त्यांच्यावर खुपच अत्याचार झालेत! लोकसभा निवडणुकीनंतर येईल शुद्धीवर' असे लिहित भाजपचे नाव न घेता निशाणा साधला आहे.

Trending