आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वार्थी राजकारणासाठी पुतळे उभारण्यापेक्षा आधी जिवंत माणसे जगवा? राज ठाकरेंचे मोदी सरकारवर फटकारे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'वरुन राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून मोदी सरकारवर चांगलीच टीका केली आहे. राज ठाकरेंनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून काल एक व्यंगचित्र प्रसिद्ध केले होते. मोदींच्या या ड्रीम प्रोजेक्टवर हजारो रुपये खर्च होत आहे, त्यावरुन राज यांनी व्यंगचित्रामधून 'वल्लभभाईंना तरी कसे पटेल?' असे म्हणत नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

 

'वल्लभभाईंना तरी कसे पटेल?' 

मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'साठी केंद्र आणि गुजरात सरकारकडून आतापर्यंत 2131.45 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून यावर आणखी 300 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. जवळपास 2400 कोटी रुपये खर्च करुन हा ड्रीम प्रोजेक्ट उभा राहणार आहे. यावरुनच राज यांनी मोदी सरकारवर टिका करत वल्लभभाईंना तरी कसे पटेल? असा प्रश्न विचारला आहे. तसेच व्यंगचित्रात '' अरे, तुमच्या स्वार्थी राजकारणासाठी अवाढव्य खर्च करुन आमचे पुतळे उभे करण्यापेक्षा, आहेत त्या जिवंत माणसं जगवा ना!" असा सल्ला सरदार पटेल हे सत्ताधाऱ्यांना देत असल्याचं चित्र त्यांनी रेखाटले आहे.

 

कसा असेल पुतळा?
गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील केवडिया या ठिकाणी हा जगातला सर्वात मोठा पुतळा उभा राहीला आहे. या पुतळ्याचं बांधकाम लार्सन अँन्ड टूब्रो या कंपनीने केले आहे. हा पुतळा ब्राँझच्या आठ मिलीमीटर जाडीच्या 7000हून अधिक शीट्स जोडून हा या पुतळ्याला आकार देण्यात आला आहे. पुतळ्याच्या पायथ्याला एक भव्य संग्रहालय आणि प्रदर्शन केंद्र बनवलं जाणार आहे. त्यासोबतच बाजूला फूड कोर्ट उभारणार आहे.

 

बातम्या आणखी आहेत...