आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राम जन्मभूमी ट्रस्टची स्थापन केल्याबद्दल संपूर्ण मंत्रिमंडळाचे मनापासून अभिनंदन- राज ठाकरे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अभिनंदन केल्याची माहिती संजय राऊतांनी ट्वीटद्वारे केली

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आयोध्येतील राम जन्मभूमी ट्रस्टची स्थापना केल्याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाचे अभिनंदन केले आहे. राज ठाकरेंनी ट्विट करुन आपली प्रतिक्रिया दिली. राज म्हणाले, "केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज 'श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र' या ट्रस्टच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीला आता वेग येईल अशी अपेक्षा. या निर्णयासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाचे मनापासून अभिनंदन."

केंद्र सरकारने आज (बुधवार) 12 सदस्यीय राम मंदिर निर्माण ट्रस्ट स्थापित केले. सुप्रीम कोर्टाने 9 नोव्हेंबर रोजी अयोध्या प्रकरणात निकाल दिला होता. यामध्ये तीन महिन्यांत ट्रस्टची स्थापना करण्यास सांगितले होते. हेच ट्रस्ट राम मंदिर उभारणार आहे. सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात मंदिरासाठी एक योजना बनवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार केंद्राने आज ही योजना ट्रस्टकडे सुपुर्द केली आहे. या ट्रस्टची दिल्लीत नोंदणी होणार आहे.

‘श्री रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्ट स्थापण्याचा माझा प्रस्ताव आहे’

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत म्हणाले की, "आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश समोर ठेवून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. राम मंदिर बांधण्यासाठी आम्ही सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टच्या स्थापनेचा प्रस्ताव सरकारने ठेवला आहे. अयोध्यामधील रामजन्मभूमीवर मंदिर बांधण्याची ट्रस्टवर जबाबदारी असेल. आम्ही उत्तर प्रदेश सरकारकडे सुन्नी वक्फ बोर्डाला 5 एकर जमीन देण्याची विनंती केली होती. सरकारने ती मान्य केली आहे."

उद्धव ठाकरेंकडूनही अभिनंदन


अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी ट्रस्टची स्थापना केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केली. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींचं अभिनंदन (Uddhav Thackeray congratulates Modi) केलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली.

उद्धव ठाकरेंनी केले अभिनंदन "अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणी करण्याचा ऐतिहासिक निर्णय देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे, हे सरकारचे कर्तव्यच होते. पंतप्रधान मोदी यांनी न्यायालय निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे कर्तव्य पार पाडल्याबद्दल अभिनंदन : उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री" असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...