Home | Maharashtra | Mumbai | Raj Thackeray do not hut Shivsena

बदलते ‘राज’कारण : भाजपच्या पराभवाचे लक्ष्य असल्याने सेनेला न दुखावण्याचे राज यांचे धोरण

विशेष प्रतिनिधी | Update - Apr 22, 2019, 09:35 AM IST

आगामी विधानसभा निवडणुकांच्या समीकरणांवर आहे डोळा

 • Raj Thackeray do not hut Shivsena

  मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा या दुकलीच्या हात धुवून मागे लागलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अद्याप शिवसेनेला लक्ष्य केलेले नाही. सध्या तरी भाजपचा पराभव करणे हाच मनसेचा प्रमुख उद्देश असून शिवसेनेला दुखावल्यास भाजपचा उमेदवार असलेल्या मतदारसंघातील शिवसैनिकही त्वेषाने कामाला लागण्याची शक्यता आहे. यामुळे तूर्तास तरी सेनेला न दुखावण्याचे धोरण मनसेने अवलंबले आहे. शिवाय शिवसेनेला न दुखावण्यामागे विधानसभा निवडणुकीची समीकरणेही लक्षात घेतली जात आहेत.
  राज ठाकरे मंगळवारपासून दुसऱ्या टप्प्यातील प्रचार सभांना प्रारंभ करणार आहेत. मुंबईसह नाशिक आणि मावळ मतदारसंघात ते चार सभा घेणार आहेत. दक्षिण मुंबई व ईशान्य मुंबई या मुंबईच्या दोन मतदारसंघात राज ठाकरेंची तोफ धडाडणार असल्याने या मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार मिलिंद देवरा आणि संजय दिना पाटील यांच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. मंगळवारी दक्षिण मुंबईतील शिवडी येथे पहिली सभा, बुधवारी ईशान्य मुंबईतील भांडूप येथे दुसरी तर गुरुवारी मावळमधील पनवेल येथे तिसरी आणि शुक्रवारी नाशकात चौथी सभा होणार आहे. त्यांच्या नियोजनासाठी सोमवारी राज यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक बोलावली आहे.


  विशेष म्हणजे दुसऱ्या टप्प्यातील प्रचारासाठी भाजपविरोधात बराच दारूगोळा जमा केल्याचे राज यांनी महाडच्या सभेत सांगितल्याने आता सरकारच्या कोणत्या योजनेची पोलखोल होणार याबाबत उत्सुकता आहे. या सभांमध्ये ते शिवसेनेला लक्ष्य करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र मनसेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तूर्तास तरी शिवसेनेला न दुखावण्याची रणनीती मनसेने अंगिकारली आहे. कारण सध्या भाजपला हरवणे हा एकमेव

  या कारणांमुळे शिवसेनेविरुद्ध मनसेचा प्रचार नाही

  भाजप सोबत शिवसेनेलाही लक्ष्य केल्यास दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकदिलाने कामाला लागतील. त्याऐवजी फक्त भाजपलाच लक्ष्य केल्यास भाजपचे उमेदवार असलेल्या मतदारसंघात युतीमुळे नाराज शिवसैनिकांची मते भाजप विरोधात जातील, असा मनसेचा होरा आहे. याशिवाय विधानसभेतही शिवसेना-भाजप युती कायम असणार असल्याने आता शिवसैनिकांची सहानुभूती मिळाल्यास विधानसभेत त्याचा भाजपविरोधात वापर करता येईल, असेही एक समीकरण शिवसेनेला लक्ष्य न करण्यामागे असल्याचे समजते.

Trending