आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरे निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची शक्यता; ईव्हीएमविरोधात नऊ ऑगस्टला मोर्चात सहभाग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ९ ऑगस्ट १९४२ ला महात्मा गांधी यांनी “चले जाव असा’ इशारा ब्रिटिशांना दिला होता. त्याच धर्तीवर आगामी ९ ऑगस्ट रोजी “ईव्हीएम चले जाव’ असा नारा देत एका सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चात मनसेप्रमुख राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मनसेतर्फे सोशल मीडियावर तसे संदेशही प्रसारित केले जाऊ लागले आहेत. तसेच जर बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या नाहीत तर निवडणुकांवर राज ठाकरे बहिष्कार घालतील, असेही सांगितले जात आहे.

 

काँग्रेसचा मनसेला विरोध
राज ठाकरे यांनी आघाडीत यावे, असा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून होत असला तरी काँग्रेसच्या काही नेत्यांचा राज ठाकरे यांना आघाडीत घेण्यास नकार आहे. त्यामुळे राज ‘एकला चलो रे’ची भूमिकाही घेऊ शकतात. मात्र, गेल्या काही काळापासून मनसेची ताकद कमी झाल्याने कितपत यश मिळेल, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...