Home | Maharashtra | Vidarva | Akola | Raj Thackeray On Tanushree Dutta Metoo, Calls Nana Patekar Indecent

#MeToo: राज ठाकरे म्हणाले, नाना पाटेकर मूर्खपणा करतो, उद्धटपणा करतो, उलट-सुलट वागतो; पण असे करू शकत नाही!

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 18, 2018, 03:42 PM IST

अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर 10 वर्षांपूर्वी सेटवर अश्लील वर्तनाचे आरोप लावले आहेत.

 • Raj Thackeray On Tanushree Dutta Metoo, Calls Nana Patekar Indecent

  अमरावती - महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मीटू, तनुश्री आणि नाना पाटेकर यांच्यावर आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी बुधवारी येथे या विषयावर बोलताना नाना पाटेकरांना मूर्ख आणि उद्धट असे म्हटले आहे. तरीही आपला नानांवर विश्वास आहे की ते असे करू शकत नाहीत असेही राज ठाकरेंनी स्पष्ट केले. एवढेच नव्हे, तर पेट्रोल दरवाढ आणि इतर महत्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष भटकवण्यासाठी #MeToo मोहिमेला प्रसिद्धी दिली जात आहे असा आरोप मनसे अध्यक्षांनी केला आहे.


  काय म्हणाले राज ठाकरे?
  अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर 10 वर्षांपूर्वी सेटवर अश्लील वर्तनाचे आरोप लावले आहेत. सोशल मीडियावर गाजलेली मोहिम #MeToo अंतर्गत तिने आपल्या भावना सर्वांसमोर व्यक्त केल्या आहेत. तिच्या या आरोपांवर बोलताना राज ठाकरे म्हणाले, "नाना पाटेकर माझ्या परिचयाचा आहे. तो कधी-कधी मूर्खपणा, उद्धटपणा करतो आणि उलट-सुलट वागतो हे मान्य आहे. पण, असली गोष्ट करेल असे मला मुळीच वाटत नाही. या प्रकरणाचे काय ते कोर्ट पाहून घेईल. यावर मीडियाला काय घेणं-देणं?"


  पेट्रोल दरवाढीवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न
  मीटू ही मोहिम अतिशय चांगली मोहिम आहे. परंतु, या मोहिमेच्या आड पेट्रोल, डीझेल दरवाढ, बेरोजगारी, रुपयांची घसरण आणि इतर महत्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. #MeToo एक गंभीर विषय आहे. परंतु, त्याची ट्विटर सारख्या माध्यमांवर चर्चा योग्य नाही." ते अमरावती येथील एका कार्यक्रमात बोलत होते. सोबतच, महिलांसोबत काही गैरवर्तन होत असल्यास त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मदत घ्यावी. आम्ही त्या आरोपींनी धडा शिकवू. यासाठी 10-10 वर्षांची वाट पाहत बसण्याची गरज नाही असे आवाहन राज ठाकरेंनी केले. ज्यावेळी हा प्रसंग घडला असेल त्याचवेळी त्यांनी आवाज उठवायला हवा. यावर बोलण्यासाठी 10-10 वर्षांची वाट पाहत बसण्याची गरज नाही असे आवाहन ठाकरेंनी केले.

Trending