आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - रस्ते, बेरोजगारी, पक्षांतर करणारे नेते, पीएमसी बँकेतील घोटाळ्यावरून राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला. काही विशिष्ट माणसे सत्तेत निवडून आली तर त्यांना भीती राहणार नाही. आपण कामे नाही केली तरी लोक आपल्याला निवडून देतात असा त्यांचा समज झाला असल्याचे राज यावेळी म्हणाले. भिवंडी येथे पार पडलेल्या सभेत ते बोलत होते.
खाटीक खान्यातील बोकडात आणि तुमच्यात काय फरक?
तुम्हाला खराब रस्त्यांचा राग येतो की नाही? 14000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या..! आपल्याला त्याबद्दल काही आहे की नाही. नोकऱ्या जात आहेत. उद्योग बंद होत आहेत. बॅंका बुडत आहेत. तरीही तुम्ही शांत आहात. वेळोवेळी त्यांनाच निवडून देत आहेत. खाटीक खान्यातील बोकडात आणि तुमच्यात फरक काय..?
मतपेटीतून राग व्यक्त करा
काँग्रेस-राष्ट्रवादीतील सगळे भ्रष्टाचारी भाजपात गेले आहेत. या लोकांना धडा शिकवण्याची चांगली संधी तुमच्यासमोर आहे. तो राग मतपेटीतून व्यक्त करा. राग व्यक्त करण्याची हीच योग्य वेळ आहे असे आवाहन ठाकरे यांनी केले. 25 जागा लढवणारा सुद्धा म्हणतो सत्ता द्या. पण मला माझा आवाका माहीत आहे.
ट्विटवर राग व्यक्त करणारा महाराष्ट्र नकोय
सत्ताधाऱ्यांना जाब विचारणारा विरोधी पक्ष देण्यासाठी मनसेला मतदान करण्याचे राज यांनी आवाहन केले. राग आला तर ट्विट करणारा महाराष्ट्र मला नकोय. जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र मला घडवायचा असेही राज ठाकरे म्हणाले.
आज कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र
राज्य सरकार 30 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याची माहिती समोर येत आहे. उद्योगधंदे बंद पडत आहेत. आज महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला, असा प्रश्न राज ठाकरेंनी यावेळी सरकारला विचारला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.