निवडणुकीच्या प्रचारासाठी मुद्दा हवा म्हणून पुलवामा हल्ला घडवला का? साताऱ्यातून राज ठाकरेंचा मोदींवर घणाघात

दिव्य मराठी

Apr 17,2019 08:47:00 PM IST


सातारा - मुंबई, नांदेड, इचलकरंजी, सोलापुरनंतर राज ठाकरेंची साताऱ्यात सभा. येथील सभेतही राज यांची भाजप आणि पंतप्रधान मोदींवर केली टीका. मोदींचे अनेक जुने व्हिडिओ दाखवून त्यांच्याकडे उत्तरे मागितली. मी निवडणूक लढवत नसलो तरी अन्यायाविरुद्ध बोलणार असल्याचा इशारा राज यांनी मोदींना दिला.

काय म्हणाले राज ठाकरे...

> निवडणूक लढवत नाही याचा अर्थ अन्यायावर बोलणार नाही असे नाही. पाच वर्षांत दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाही ती चव्हाट्यावर मांडणार. थापा मारणाऱ्यांवर वचक बसण्यासाठी व्हिडिओ क्लिप्स दाखवतो - राज ठाकरे


> मुघल आणि ब्रिटीशांसोबत लढण्यासाठी महाराष्ट्रातून पहिला आवाज उठवण्यात आला. तर मग मोदी आणि शहांविरोधात महाराष्ट्रातून आवाज उठवला नाही तर मग काय उपयोग.

> मोदी-शहांनी पाच वर्षांत दाखलेल्या रंगांवरून कसे तुमचे चिरहरण होईल ते दिसून येते.

> पंतप्रधान होण्यापू्र्वी अगोदरच्या सरकारला विचारले प्रश्न. पण आता विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर देण्यास मोदी तयार नाही.

> 1947 पासून पंतप्रधान झाल्यानंतर एकही पत्रकार परिषद न घेणारे मोदी हे देशातील पहिले पंतप्रधान.

> झटका आला म्हणून नोटबंदी केली. याबाबत आरबीआयच्या गर्व्हनर, अर्थमंत्री आणि मंत्रिमंडळाला सांगितली नाही माहिती. नोटबंदीनंतर साडे चार ते पाच कोटी लोकांच्या पोटावर पाय.

> निवडणुकीच्या काळात फेकण्यात आलेला पैसा भाजपाकडे आला कोठून याचे भाजपाकडे उत्तर आहे का? नोटबंदीनंतर भाजपाकडे एवढा पैसा आलाच कसा? राज ठाकरेंचा भाजपाला सवाल

> विरोधीपक्षात असताना जीएसटीला केला होता विरोध पण सत्तेत आल्यानंतर स्वतः लागू केली जीएसटी. यामुळे अनेक उद्योगांना फटका.


> मीडियातील विविध चॅनेल्स, अनेक पत्रकांरांवर आणली बंदी, देशातील गोंधळ जनतेसमोर येऊ यासाठी केला खटाटोप. पण सोशल मीडियामुळे सत्य लपून राहिले नाही.

> सैनिकांच्या मृत्यूचा राजकीय फायदा करून घेत आहेत मोदी, निवडणुकीच्या प्रचारासाठी माध्यम हवे यासाठी एअर स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईक केले. राजकीय फायदा करून घेण्यासाठी पुलवामा हल्ला यांनीच घडवला असल्याचा संशय.

> मोदी सरकारच्या काळात शहीद झालेल्या सैनिकांची संख्या जास्त.

> नवाज शरीफांच्या भेटीनंतर शहीद जवानांच्या कुटुंबीयांना काय वाटले असेल?

> मोदींच्या धोरणांमुळे सैनिकांना काश्मीरमध्ये आज मारहाण होत आहे.

> सैनिकांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे आमदार परिचारक अजूनही भाजपात का? अकलुजमधील मोदींच्या सभेत परिचारकची हजेरी.

> जवानांच्या नावावर राजकारण करणाऱ्या मोदींनी सैनिकांना मागायला लावली माफी. त्यांच्यावर केसेस टाकल्या.

> फ्लॉप होण्याच्या भीतीने 'पीएम मोदी' चित्रपटाचे प्रदर्शन टाकले लांबणीवर

X