विधानसभा 2019 / पावसामुळे पुण्यातील राज ठाकरेंची सभा अखेर रद्द, दुपारपासून पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे

मनसेची पुण्यात पहिलीच प्रचार सभा होती

दिव्य मराठी वेब टीम

Oct 09,2019 07:07:10 PM IST

पुणे- विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्व पक्षांनी आपल्या प्रचार सभा सुरू केल्या आहेत. मनसेनेही पुण्यातून आपल्या प्रचाराचा नारळ फोडण्याचे ठरवले होते. पण, आता राज यांच्या सभेवर पावसामुळे विघ्न आले आहे. पुण्यात सध्या जोरदार पाऊस पडत असल्याने नातू बागेतील मैदानावर होणारी राज ठाकरेंची सभा अखेर रद्द करण्यात आली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांकडून प्रचार सभा आणि रॅली काढल्या जात आहेत. या दरम्यान मनसेची पहिली सभा पुण्यात आयोजित केली होती. पण, काल पुण्यात रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे नातू बागेतील मैदानावर पाणीच पाणी पाहण्यास मिळाले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी मैदानावरील बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. दिवसभर पाऊस पडला नाही, त्यामुळे सभा होईल असे सांगितले जात होते. पण, दुपारनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे मैदानात परत पाणी साचले आणि अखेर राज ठाकरेंची सभा रद्द करण्यात आली.

X
COMMENT