आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईडी चौकशीनंतर राज ठाकरे यांचे बोलणे कमी झाले; अजित पवारांचे धक्कादायक विधान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती - ईडी चौकशीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे बोलणे कमी झाले, असे  धक्कादायक विधान माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले आहे. बारामतीतील सोमेश्वर येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. विरोधी पक्षाच्या नेत्यांना सत्ताधारी पक्ष पैशांची आणि विविध चौकश्यांची भीती दाखवत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. 

ईडी चौकशीनंतर राज यांनी दिली होती प्रतिक्रिया 
22 ऑगस्ट रोजी ईडीने राज ठाकरे यांची साडेआठ तास चौकशी केली होती. यावेळी ईडीच्या प्रश्नांना राज यांनी काय उत्तरे दिली ते अजूनही गुलदस्त्यात आहे. दरम्यान चौकशीत मला जे काही सांगायचे आहे ते मी त्यांना सांगितले आहे. अशा कितीही चौकशा केल्या तरी माझं तोंड बंद राहणार नाही अशी पहिली प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली होती.  मात्र त्यांच्या या प्रतिक्रियेवर अजित पवार यांनी टोला लगावला आहे. ईडीकडून चौकशी झाल्यानंतर राज ठाकरे यांचे बोलणे कमी झाले असल्याचे म्हणत त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. 

बातम्या आणखी आहेत...