आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Raj Thackeray Speech At Mumbai Opposes Evm And Demand Ballet Paper For Upcoming Election

मुंबईत मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा, राज ठाकरेंनी केले संबोधित; केंद्रसरकारवर साधला निशाणा, EVM विरोधात लोकांकडून फॉर्म भरून घेणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबईतील प्रभादेवी येथे मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा शनिवारी पार पडला. या मेळाव्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित करतांना केंद्र सरकारवर निशाणा साधला. ईव्हीएम, जीएसटी, नोटबंदी, यांसारख्या अनेक विषयांवर टीका केली. दरम्यान ईव्हीएमविरोधात 21 तारखेला मोर्चा काढण्यात येणार होता. पण राज्यातील पूरस्थितीमुळे तो ढकलण्यात आला आहे. मोर्चाची तारीख लवकरच जाहीर होणार असल्याचे राज यांनी सांगितले. 

काय म्हणाले राज ठाकरे :-
> आज आपण सर्वसाधारण काय झालंय त्यावर बोलू
Tv वर कसं दाखवतात तसं आधी ठळक बातम्या वाचू, तर त्या अश्या, 
आरटीआयमध्ये फेरबदल झाले, म्हणजे आता हा अधिकार केंद्राने स्वतःकडे ठेवला आहे. आरटीआयमधील सगळी माणसं केंद्र ठरवणार, केंद्राचा अर्थ काय तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा, कारण सगळं ते ठरवणार. आरटीया अधिकाऱ्याला तिथे राहायचे असेल तर सरकार समोर मिंदे व्हावे, म्हणजे यापुढे माहिती मिळणार नाही

> पुढचा कायदा केला दहशतवादी विरोधी कायदा, यात काय तर एका माणसावर संशय आला तरी तो दहशतवादी, पण दहशतवादाची व्याख्या काय, तर नाही. म्हणजे उद्या आंदोलन केल्यास तुम्हालाही दहशतवादी ठरवतील. म्हणजे कोणाला तुरुंगात टाकायचं हे शहा ठरवणार.
 
> देशाची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली आहे. जेट एअरवेज बंद झाले पण सरकारने मदत नाही केली. बरेच लोक बेरोजगार झाले. बरेच व्यवसाय बंद व्हायला आले. हिंदुस्थान आरोनॉटिक्स बंद झाले. Bsnlमधील 54 हजार लोक बेरोजगार झाले. ही परिस्थिती अशीच राहिली तर 10 लाख लोक बेरोजगार होतील. टाटांनी टाटा मोटर्स 5 दिवस बंद ठेवली.

> स्टेट बँक तोट्यात. RBI कडून सरकर पैसे काढत असेल आणि बँका डबघाईला आल्या तर त्या बँकांना कोण पैसे देणार, तुमचे पैसे मग गेले. महाराष्ट्रात दीड लाख तर देशात 6 लाख कंपन्या बंद झाल्या.
 
> एक माणसाला वाटले नोटा बंद कराव्यात, पण या नोटबंदीचा परिणाम काय होईल हे मी सांगितले होते. त्यावेळी रांगेत उभे राहून लोक मेले.
 
> GST वर पैसे केंद्राकडून येत नसतील तर राज्य महापालिका कशा चालणार? आणि आम्ही 370 रद्द झालोय तेच घेतोय. हे कलम घेऊन आपण बसलोय पण 371 मतदारसंघात घोळ होतो. 
 
> मोदी म्हणतायत काश्मीरमध्ये रोजगार निर्माण करु, पण इतर राज्यात का नाही रोजगार निर्माण केला जात?
 
> तुमचं दुर्लक्ष केलं जातंय, नमोनमोचा जप करणाऱ्याच्या घरावर टकटक होईल तेव्हा कळेल, यांचे अनेक समर्थक यांना आता शिव्या देत आहेत. पण यांना तुमची काळजी नाही.
 
> उद्या समान नागरी कायदा, मग राम मंदिर काढतील आणि आम्ही पेढे वाटू पण हातात काहीच लागणार नाही.
 
> स्वातंत्र्यानंतर प्रांत रचना करावी लागली, पण ती मेल्यानंतर सगळं हे खोदून मोडतायत.
 
> अस्मिता काय असते ते पश्चिम बंगालला विचारा. त्यांच्या मंत्रालयात गेलो होतो तिथे लिफ्टमध्ये आपल्यासारखे दरवाजा बंद करा नाही तर किशोर कुमारची बंगाली गाणी लागली होती. आमच्या मंत्रालयात मराठी गाणी लागतील काय ? याला म्हणतात अभिमान.

> गुजरातमध्ये आंदोलन झाले तेव्हा त्या लोकांना बाहेर काढले. ते गावी न जात इथे आले.
 
> हे ज्यांनी केलं ते कल्पेश ठाकूर त्यांचा भाजपात प्रवेश झाला. त्याला भाजपमध्ये प्रवेश मिळतो आणि आमच्यावर केसेस पडतात.
 
> आज काश्मीरमध्ये सैनिक घुसले, इंटरनेट, टेलिव्हिजन बंद केले. उद्या विदर्भ मुंबई असेल.
महाराष्ट्रातही सगळ्या गोष्टी बंद करून तुमचा विचार न करता लचके तोडतील. ही हिंमत आली कोठुन तर बहुमताने.
 
> त्यांचे आमदार व इतर लोक कोणाही बाईवर हात टाकतायत, रेप होतायत, पण बातम्या एक दिवस दाखवणार. 
 
> पत्रकारांना सरकार विरोधात लिहायचं आहे, पण लिहू दिल जात नाही. सरकारच्या फेवर मधल्या बातम्या 2 ते 5 दिवस चालतील.
 
> न्यायालयातून न्याय मिळेल हे शक्य नाही. आपण कशात जखडले जातोय याचा अंदाज नाही
 
> मी म्हटले होते उद्या तुम्ही सगळे बघाल पण लिहू शकणार नाही. काही मीडिया दाखवते पण त्यांच्यावर नंतर दबाव टाकण्यात येतो. या सगळ्या गोष्टी कशामुळे सुरू आहेत. यासाठी हे आंदोलन सुरू आहे. सगळ्या गोष्टींचा विचार करून मी या निर्णयावर आलो आहे. 

> मागील दोन तीन महिन्यात सांगण्यास सुरुवात झालीय मुख्यमंत्री बोलले 250 जागा येतील, मग आम्ही काय करायचं, 28 जागांत गोट्या खेळायच्या का?

> आकडा सांगून मग तुम्हाला पटवून देण्यासाठी पुलवामा, आणि सारख्या गोष्टी सांगायच्या.
लोक हल्ली घरातल्या घरात संशयाने बघायला लागलेत. रात्री माझ्यासोबत बसला होता, आणि आज…… घरात मतं 15 आणि पडले 2
 
> जे आटोक्यात येत नाहीत त्यांना चोपड्या आणि नाहीतर घरी. चोपड्या काढून गप्प केलं जातं.

> फडणवीसांनी यात्रा केली आणि परिवर्तन झाले, असे म्हटले जाईल. लोकांनी भाजपला मतदान केले, काश्मीरचा परिणाम असे सांगितले जाईल.
 
> राज्यसभेत कुठे जागा कमी आहेत त्या आता भरा, मग तुम्हाला कोण विचारतोय.
 
> भाजपचे जे फॉलोवर असतील समाज माध्यमांवर त्यांच्यावर या लोकांचा जेव्हा वरवंटा फिरेल तेव्हा तुमची जात पाहून नाही तर मराठी म्हणून फिरेल. तेव्हा तुम्ही सांगू शकणार नाही मी तुमचाच प्रचार केला. कारण वरवंटा सरसकट फिरेल. पण तुम्हाला अजून नाही कळणार, कारण दरवाजावर टकटक नाही झाली.

> निवडणूक आयुक्तांना भेटून मशीन कुठे बनतात? आणि जीव म्हणजे चिप कुठे बनतात विचारले. तर ते म्हणाले अमेरिका आणि एका कंपनीच नाव सांगितलं. तर ही आधीच तफावत मतांची त्या चिपमध्ये तिथे नाही का करत येत. पण या तफावतीबाबत निवडणूक आयोग उत्तर द्यायला तयार नाही. 

> पुढे तुम्ही कोर्टात जाल पण तिथेही तुम्हाला न्याय मिळणार नाही कारण हेच आधी तिथे जाऊन केस टाकून घोळ घालतात
 
> मंत्री मंडळात कोणाला घ्यायचं नाही हे आधीच ठरल होतं. सेनेच्या 4 वरिष्ठ खासदारांना मंत्री मंडळात घ्यायचे नाही म्हणून त्या 4 जागांवर राष्ट्रवादी आली, म्हणजे ठरवून पाडलं. अमरावती नवनीत राणा निवडून आल्या, तणाव निर्माण करायला सिनियर चंद्रकांत नको म्हणून त्यांना पाडून MIM चा आणला. अनंत गीते सिनियर पडले, आणि काँग्रेसला नको होता तो निवडून आला बाळू धानोरकर. निवडून आलेल्यांना आणि पडलेल्या सगळ्यांनाच धक्का बसलाय की निकाल असा कसा लागला.
 
> आता राम मंदिर आणतील, पण त्या रामराज्यात काय घडले होते. तर एका धोब्याने संशय घेतल्यामुळे रामाने सीतेला पाठवून दिले होते. मग आता एवढे लोक संशय घेतायत तर तुम्ही ईव्हीएमला का हटवत नाही?

> शिक्यावर शिक्का मोर्तब, माझा मत शिक्याला. मनसेकडून EVM विरोधात फॉर्म तयार करण्यात आला आहे. मनसे सैनिकांनी हा अर्ज लोकांकडून भरून घ्यायचा आहे.