आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदी यांची थापांची पतंगबाजी; राज ठाकरेंनी 'संक्रात विशेष' व्यंगचित्रातून उडविली खिल्ली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्यंगचित्रातून टार्गेट केले आहे. मकर संक्रातीनिमित्त राज ठाकरे यांनी एक व्यंगचित्र रेखाटले आहे.

 

काय आहे व्यंगचित्रात...?

पंतप्रधान मोदी हे 10 टक्के सवर्ण आरक्षणाचा पतंग उडवत आहेत. त्यांच्यासोबत अमित शहा, भक्त आणि मीडीया उपस्थित आहेत. तसेच मोदी सरकारने देशातील जनतेला आधी दिलेल्या आश्वासनांचे मेक इन इंडिया, नोटाबंदी, स्वच्छ भारत, जीएसटी, देशी काळा पैसा, डिझेल-पेट्रोलचे दर, कर्जमाफी, प्रतिवर्षी 2 कोटी रोजगार, परदेशी काळा पैसा, नीरव मोदी, मल्ल्या, चोक्सी आणि इतर असा मजकूर असलेले पतंग गच्चीत पडलेले राज यांनी आपल्या व्यंगचित्रात दाखवले आहे.

 

दरम्यान, गेल्या आठवड्यात मोदी सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हे आरक्षण तांत्रिकदृष्ट्या टिकणार नाही, असा अंदाज घटनातज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यावरून ही मोदी यांची नवी थाप आहे, अशा आशयाचे व्यंगचित्र राज ठाकरे यांनी मकर संक्रांतीनिमित्त रेखाटले आहे.

बातम्या आणखी आहेत...