आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंकडून छत्रपतींच्या 'राजमुद्रे'चा गैरवापर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरुद्ध संभाजी ब्रिगेडकडून पुण्यात तक्रार दाखल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे दाखल केली तक्रार

पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईतील गोरेगावमध्ये पहिले महाअधिवेशन होत आहे. या अधिवेशनासाठी राज्यातून हजारो मनसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. या महाअधिवेशनाचे प्रमुख्य आकर्शन होते, ते म्हणजे मनसेच्या नव्या झेंड्याचे अनावरण. अनेक दिवसांपासून या मनसेच्या नव्या झेंड्याची चर्चा होती. यातच माध्यमांमध्ये भगव्या रंगवार छत्रपती शिवाजी माहाराजांची राजमुद्रा असल्याचा झेंडा दाखवण्यात आला होता. असाच झेंडा मनसेने आणला. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा वापर झेंड्यावर केल्यामुळे संभाजी बिग्रेडने पुण्यात मनसेविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
राजमुद्रेचा वापर कोणत्याही राजकीय पक्षाने करणे चुकीचा आहे. राजमुद्रेचा झेंड्यात वापर करण्याचा कोणताही नैतिक अधिकार राज ठाकरे यांना नसल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. तसेच राजमुद्रेच्या वापरामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी संभागी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे. 'राजमुद्रे'चा गैरवापर करून मताचा जोगवा आम्ही मागू देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिला आहे.  राज ठाकरेंच्या विरोधात गुन्हा दाखल करावा असा तक्रार अर्ज पुण्याच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांकडे करण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...