आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Raj Thackeray Visits Delhi: On The Occasion Of Meeting Of The Commission In Delhi, Talked To Sonia Gandhi

राज ठाकरे दिल्ली दौरा : निमित्त दिल्लीत आयोगाच्या भेटीचे, चर्चा सोनिया गांधींशी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली  - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी दिल्लीत  सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. देशातील सध्याच्या परिस्थितीला निवडणूक नव्हे तर आंदोलनातून उत्तर देण्याची गरज असल्याची भूमिका त्यांनी या मांडल्याचे कळते. लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी सभा घेत वातावरण ढवळून टाकणाऱ्या राज ठाकरे यांच्या सोनिया गांधींशी भेटीने राज्यात तर्कांना ऊत आला आहे.


तत्पूर्वी, राज ठाकरे यांनी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि इतर अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. या वेळी त्यांनी राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर असून मतपत्रिकांचाच वापर केला जावा, अशी विनंती केली.   मात्र निवडणूक अधिकाऱ्यांच्या हावभावांकडे पाहता मला ते या मुद्द्यावर गंभीर दिसले नाहीत. निवडणूक आयोगाकडून शून्य मला अपेक्षा आहेत, मात्र केवळ अौपचारिकता म्हणून त्यांना पत्र देऊन आल्याचे राज ठाकरे यांनी या वेळी सांगितले.