आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरे यांचा लाडका श्वान \'बाँड\'ने घेतला जगाचा निरोप; शर्मिला ठाकरेंचा घेतला होता चावा, चेहऱ्यावर पडले होते 65 टाके

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)अध्यक्ष राज ठाकरे यांचा लाडका श्वान 'बाँड' याने बुधवारी दुपारी जगाचा निरोप घेतला. शिवाजीपार्क येथील स्मशान भूमीत बाँडवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या लाडक्या कुत्र्याला निरोप देण्यासाठी राज ठाकरे स्वत: स्मशान भूमीत उपस्थित होते.

 

राज यांचा 'कृष्णकुंज' बंगल्यावर जेम्स व बॉन्ड अशा दोन श्वान होते. दोन्हीही ग्रेट डेन जातीची होती. त्यातील बाँडचे निधन झाले. काही दिवसांपूर्वीच जेम्स आणि बाँड या दोघांनी रॅम्बो या पिल्लाला जन्म दिला होता. जेम्स आणि बाँड हे दोन्ही राज यांचे लाडके कुत्रे होते. ते दोघेही तळमजल्यावर राहत होते.

 

शर्मिला ठाकरे यांना घेतला होता चावा... चेहर्‍यावर पडले होते 65 टाके..

काही वर्षांपूर्वी 'बाँड'ने राज यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांना चावा घेतला होता. शर्मिला यांच्या  चेहर्‍याला गंभीर दुखापत झाली होती. त्यावेळी त्यांना तब्बल 65 टाके घालण्यात आले होते. नंतर त्यांच्यावर प्लास्टिक सर्जरीही करण्यात आली होती.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..

 

बातम्या आणखी आहेत...