आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोहिनूर मील गैरव्यवहार प्रकरण; नऊ तासांच्या चौकशीनंर राज ठाकरे ईडी कार्यालयातून बाहेर, कोणतीही प्रतिक्रीया नत देता हात जोडून निघून गेले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  नऊ तास चाललेल्या चौकशीनंतर राज ठाकरे ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले. सकाळी 11.30 वाजता सुरू झालेली चौकशी रात्री 8 वाजेपर्यंत चालली. चौकशी संपल्यानंतर राज ठाकरे बाहेर आले आणि कोणतीही प्रतिक्रिया न देता निघून गेले. राज ठाकरेंचे कुटुंबीय जवळपास दोन तासांपासून बाहेर वाट पाहत होते.
 
राज ठाकरे हे सहकुटुंब चौकशीसाठी गेले, यावेळी पक्षाचा कोणताही पदाधिकारी किंवा नेता त्यांच्यासोबत नव्हता. यावेळी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान मनसेचा विरोध पाहता मुंबईतील अनेक चौकात आणि मुख्य रस्त्यांवर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता