आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज ठाकरेंची सभा पावसाने धुतली! मुसळधार पावसामुळे पुण्यातील नियोजित सभा केली रद्द

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - विधानसभा निवडणुका लढवण्याचा सर्वात उशिरा निर्णय घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचाराच्या शुभारंभातही अनेक अडथळे येत आहेत. पुण्यातून प्रचाराची सुरुवात करण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतला, मात्र जागा मिळत नव्हती. आता कशीबशी सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या मैदानाची जागा मिळाली. त्यानुसार बुधवारी सायंकाळी सभा ठरलीही, मात्र त्याच वेळी जोरदार पावसाने हजेरी लावली अन‌् मैदानाचा चिखल झाल्याने पहिलीच सभा राज यांना रद्द करावी लागली.

नातूबाग परिसरातील सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या मैदानावर सभेची तयारी झाली हाेती. मात्र, मंगळवारपासून जाेरदार पाऊस झाल्यामुळे या मैदानावर पाण्याचे डबके साचले हाेते. दिवसभर युद्ध पातळीवर प्रयत्न करत मैदान चांगले करण्याचा प्रयत्न केला. जेसीबीच्या साहाय्याने माती, वाळू, खडी आणून मैदानावर टाकली. मात्र, बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पुन्हा जोरदार पावसाचे आगमन झाले आणि सर्व तयारी पाण्यात वाहून गेली. कार्यकर्ते खुर्च्या घेऊन उभे हाेते, मात्र फार काळ ते टिकाव धरू शकले नाहीत. व्यासपीठावरील फाेटाेच्या प्रतिमा, महाराजांचा पुतळा उचलून बाजूला नेऊन ठेवण्यात आला आणि स्पीकर्सही बंद करण्यात आले. मनसेचे शहराध्यक्ष आणि कसबा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अजय शिंदे यांनी राज ठाकरे यांच्याशी बाेलणे केल्यानंतर सभा रद्द करण्यात आल्याचे सांगितले.