आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर बोलण्याऐवजी 370 वर बोललं जातं', भांडूपमध्ये राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर सर्वच पक्षांनी प्रचास सभांचा धडाका लावला आहे. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरेही सभा घेत आहेत. काल मुंबईत दोन सभा झाल्यानंतर आज राज ठाकरे यांच्या आज मुंबईत तीन जाहीर प्रचारसभा होत आहेत. राज ठाकरेंची पहिली सभा भांडुप पश्चिम येथे दुसरी सभा भांडुप पूर्व येथे तर तिसरी सभा घाटकोपरमध्ये होत आहे. यावेळी त्यांनी 'आरे'चा मुद्दा घेत सरकारला चांगलंच फैलावर घेतलं. आपल्याकडे रात्री झाडांना हात लावला जात नाही, पण निर्दयी सरकारने रातो-रात झाडांवर बुल्डोजर चढवला, असा आरोप राज यांनी केला.राज ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे


> यांना प्रश्न विचारायचे कोणी? असा हतबल महाराष्ट्र मी पाहू शकत नाही
> नोकऱ्यांवरुन दहा-दहा हजार लोकांना कामावरुन काढून टाकण्यात येत आहे, आहेत ती उद्योगधंदे बंद होत आहेत
> नफ्यातील भारत पेट्रोलियमचा प्रकल्प रिलायन्सला देण्याचा घाट सुरु आहे
> सरकारला जो निर्णय हवाय तोच निर्णय न्यायालय देत आहे
> मेट्रोसाठी कारशेड उभं करण्यासाठी पर्यायी जागाही दिली होती मात्र, आरेतील झाडे कापून टाकली
>विरोधीपक्ष नेताच भाजपमध्ये गेले
> मनसेच्या सैनिकांमुळे राज्यातले टोलनाके बंद झाले 
>टोलमुक्त महाराष्ट्र करण्याचं शिवसेना-भाजपने म्हटलं होतं पण अजूनही टोलनाके सुरु आहेत
> मला सरकारवर अंकुश ठेवायचा आहे आणि त्यासाठी प्रबळ विरोधीपक्ष हवाय
> ज्या-ज्या वेळी मनसेने आंदोलन सुरु केलं ते आंदोलन पूर्ण केलं
> मुंबईत चौथी भाषा आणण्याचा प्रयत्न केला तर परत बांबू बसेल
> मोबाइल फोन कंपन्यांचे येणारे फोन, मेसेजमध्ये केवळ हिंदी आणि मराठी भाषा होती मात्र, मनसेच्या दणक्याने मराठी भाषा सुरु करावी लागली
>आता विरोधी पक्षाच्या उमेदवाराला कशाला मतदान करतायत असा प्रचार करतील पण तो तुमचा आवाज आहे, तुमचा राग घेऊन, तुमच्या मनातील चिड घेऊन तो विधानसभेत जाणार आहे.
> देशातील उद्योगधंदे बंद होत आहेत
> ग्रामीण भागात शेतकरी आत्महत्या करत आहेत मात्र कुणाला काहीही पडलेलं नाहीये, गेल्या पाच वर्षांत 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली